विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

ज्येष्ठ महिन्यात आपापल्या ठिकाणावरून पंढरपूरला विठू माऊलीच्या भेटीला निघालेल्या सर्व पालख्या हळूहळू पुढे सरकत आहेत. प्रत्येक मुक्कामाला परंपरेप्रमाणे ठरलेले विधी, रिंगण, भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम चालू आहेत.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते. चालून चालून थकलेल्या पावलांना तेलाने चोळून देणारी, अंग चोळून देणारी तरुण पिढी माणसांत देव पाहत आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे त्यांच्यातील देवाचीच सेवा होय.

मुलांनो, 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' असते, याचे प्रत्यंतर दिंडीत चालताना येते. देव माणसांतच आहे या विश्वासाने प्रत्येक जण दुसऱ्याला 'माऊली' म्हणतो, एकमेकांच्या पाया पडतो. तिथे स्त्री-पुरुष किंवा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद राहत नाही. सर्व जण एकाच पंक्तीला जेवण करतात.

वारीतून हीच समानता अंगीकारू व सामाजिक ऐक्य साधू.

सौ. स्नेहलता स. जगताप. 

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या