मनाची शुद्धता


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 :

दैनंदिन जीवनात बऱ्याच दिवसांनी कोणी भेटले की 'कसे आहात?' वगैरे चौकशी करतात. 'मुले किती आहेत? काय करतात? कुठे असतात?' हे पुढील प्रश्न असतात.

तुमची संपत्ती किती आहे? बंगला, जमीन कुठे व किती आहे? याची कोणी चौकशी करत नाही. कमी-अधिक ते प्रत्येकाकडे असतेच; पण मुलांचे शिक्षण, नोकरी हा महत्त्वाचा विषय असतो.

तुमची मुले तुमच्याबरोबर राहतात का? काळजी घेतात का? नातवंडे किती व कशी आहेत? वगैरे चौकशीमधून तुमचे कौटुंबिक स्थैर्य आणि मुलांवरील संस्कार न सांगताही समजतात.

आजचा संकल्प

संपत्ती गरजेपुरती हवीच, पण पैसा म्हणजे श्रीमंती नव्हे याचे भान ठेवू व सर्व कुटुंबीय आनंदाने एकत्र राहून जीवनाचा आनंद घेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

=================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या