चल रे पावसा
(षडाक्षरी)
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/07/ 2026 :
पावसा घालतो
तुला मी साकडं,
चल रे जाऊया
माझ्या गावाकडं.
ऐक जरा माझ
तहानलं गाव,
उगाच कशाला
खातोस तु भाव.
ओढा सुकलाय
भेगळलं रान,
प्राण्याची पक्षाची
भागव रे तान.
तिन्हीही ऋतुचा
तूच एक राजा,
या वर्षी लांबून
बघू नको मजा.
उशीरच झाला
नकोच घाबरू,
सत्कारच तुझा
आम्ही सारे करू.
चल रे पावसा
माझ्या गावाकड,
बळीराजा तुला
घालतो साकडं.
दत्तात्रय गणपतराव इंगळे (आलूरकर), सोलापूर.
7588216115
==============

0 टिप्पण्या