मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/7/2026 :
प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात. ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गस्थ होताना अखंड प्रयत्न गरजेचे असतात. सराव व सातत्य टिकवून ठेवावे लागते. जोडीला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हवा.
एखादी गोष्ट हाती घेतली किंवा करायची ठरवली, तर तिचा पाठपुरावा करावा लागतो. योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात. चालढकल किंवा आळस करून जमत नाही.
काही वेळा खूप प्रयत्न लागतात, काही वेळा पटकन यश येते. आपल्या ध्येयाची काठिण्यपातळी किती आहे, त्यावर ते अवलंबून असते. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साथ असली की यश मिळते.
आजचा संकल्प
'प्रयत्नांती परमेश्वर' हे लक्षात घेऊ व ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांच्या जोडीला सातत्य व सलगता ठेवू आणि यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या