जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/7/2026 :
जगात हजारो वेगवेगळ्या प्रकारची रेल्वे स्टेशन्स आहेत. पण, जगातील कोणत्या देशात सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी किती प्लॅटफॉर्म आहेत? जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. हे स्टेशन त्याच्या प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकच्या संख्येसाठी जगात प्रसिद्ध आहे. या रेल्वे स्टेशनला ‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’ म्हणतात. हे एक भव्य रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक ४४ प्लॅटफॉर्म आहेत.
या रेल्वे स्टेशनवर ६७ ट्रॅक आहेत. हे खरोखरच एक अतिशय भव्य रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन तब्बल ४८ एकर मध्ये पसरलेले आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद आहे. या रेल्वे स्टेशनवरून दररोज अंदाजे १.२५ लाख प्रवासी प्रवास करतात. या स्टेशनवर दररोज ६६० हून अधिक गाड्या थांबतात. या रेल्वे स्टेशन मध्ये भूमिगत ट्रॅक आहेत, ज्यात ४४ प्लॅटफॉर्म, वरच्या स्तरावर ४१ ट्रॅक आणि खालच्या स्तरावर २६ ट्रॅक आहेत.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या