मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/7/2026 :
शुद्धता... सगळीकडेच आवश्यक आहे. अन्न-पाणी शुद्ध हवे, हवा शुद्ध हवी, विचार शुद्ध हवेत. या गोष्टी लिहायला छान वाटतात, तशा त्या वाचताना पण छान वाटतात.
पण त्या आचरणात आणण्यासाठी सवयीच्या झाल्या पाहिजेत. घरातील पिण्याच्या पाण्याची जशी आपण स्वच्छता राखतो, उष्टे-खरकटे भांडे जसे त्यात बुडवत नाही, तसे सार्वजनिक जलसाठे सुद्धा जपले पाहिजेत.
दररोजच्या देवपूजेच्या निर्माल्यापासून, उरलेले अन्न, नको असलेले कपडे, प्लास्टिक, मैलायुक्त सांडपाणी, कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, मेलेली जनावरे, माणसांच्या अस्थी व रक्षा अशा किती गोष्टी आपण पाण्यात सोडतो? पाण्याचे स्रोत आपण का दूषित करतो?
आजचा संकल्प
पुस्तकी ज्ञान घेऊन कितीही पदव्या मिळवल्या असल्या, तरी व्यवहारज्ञानाचा उपयोग करू व भविष्याचा विचार करून, होणाऱ्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी जलसाठे जपू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या