तोकडे कपडे ही आपली संस्कृती नाही? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 14/7/2026 :

         तोकडे कपडे वापरणं ही आपली संस्कृती नाही. एकेकाळात होती. जेव्हा माणूस माकडरुपात झाडावरुन खाली जमीनीवर राहायला आला होता. तो प्राण्यांचे कच्चे मांस खायचा. ते रानटी व पशुगत जीवन होतं व कपडे म्हणजे काय? ते त्याला समजत नव्हतं. मध्यंतरी काही जातीजमातीही तोकडे कपडे वापरायच्या. कारण त्यांना पुरेसे कपडे घ्यायला पैसेच मिळायचे नाहीत. विश्वकोटीचं दारिद्र्यच.  तेही त्यांच्याच बिरादरीत राहायचे. त्यांची घरं वा अधिवास वेगळाच होता. तसंच तेही जनावरांचे कच्चे मांस खायचे. परंतु आज तसं नाही. समाज सुधारला आहे व समाजाला पुरेसे कपडे घ्यायला पैसे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असतांनाही काही लोकं आजही तोकडे कपडे वापरतात. मोठमोठ्या रेस्टॉरेंटमध्ये जातात. दारु पितात. भाजलेलं मांस खातात, मदिरापान करतात व मादकतेनं कुणावरही बलात्कार करीत सुटतात. हे पशुगतच वागणं व वावरणं, फॅशनच्या नावाखाली. त्यांना काही म्हणताही येत नाही. म्हटलं तर स्वातंत्र्य आहे म्हणतात व स्वातंत्र्यावर आपण गदा आणत आहात. असंही म्हटलं जातं. परंतु अशांनी समाजात मिसळून समाजाला बदनाम करण्याऐवजी आपला वेगळा अधिवास करावा. जेणेकरुन भारतासारखी सुसंपन्न, सुसंस्कृत असलेली संस्कृती बदनाम होणार नाही.

           आपण भारत देशात राहतो व आपल्या भारताचा आपल्याला अभिमान आहे. तसंच जो भारतवाशी असेल व जो भारतात राहात असेल, त्या सर्वांना आपल्या देशाचा अभिमानच वाटत असेल. अशावेळेस आपल्या भारताला कोणी नावबोटं ठेवल्यास आपल्याला भयंकरच नाही तर महाभयंकरच राग येवू शकतो. याचं कारण आहे आपली संस्कृती. आपण भारताला आपल्या आईचा दर्जा दिलाय. 

         आपण भारत देशात राहतो व आपण सर्वजण भारत देशाचे नागरिक आहोत. आटल्या भारताचीही एक संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती पवित्र मानतो. कारण आहे, आपली आई व आपल्या आईची शिकवण. आपली आई आपल्याला जन्म देते. ती जेव्हा जन्म देते. तेव्हापासूनच ती आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते. ती आपल्याला न्हाऊपिवू घालते व आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यापर्यंत सक्षम बनवते. अशातच आपली हळूहळू वाढ होते आणि आपल्याला असलेल्या मेंदूचीही हळूहळू वाढ होते. मग प्रगल्भ झालेला मेंदू विचार करायला लागतो. तोच मेंदू कालांतरानं काय वाईट व काय चांगलं. हे ओळखण्याची जाणीव जागृती देत असतं. अशावेळेस कोणी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपल्यालाही चांगलं वाटत व कोणी वाईट म्हटल्यास आपल्यालाही वाईटच वाटतं.

        आपली आई आपल्याला आवडते. असा जगात कोणीच नसेल की ज्याला आपली आई आवडत नाही. पशुपक्षांनाही त्याची आई आवडतेच. कारण ती आई आपल्या बाळाला दूध पाजते. त्याची काळजी घेते. त्यातच जर कोणी एखाद्या व्यक्तीनं आपल्या आईला शिव्या दिल्यास वा एखादा अपशब्द बोलल्यास आपल्याला राग येतो. एवढा राग येतो की आपण त्या व्यक्तीचा समाचार घेत असतांना त्याचा खुनही करावासा वाटतो आणि करुनही टाकतो. हे लहानपणी आणि मोठेपणीही निदर्शनास येतं. एवढं आपलं आईवरचं प्रेम. तसंच आपल्याला आपल्या भारताबद्दल वाटत असतं, कोणी काही अपशब्द बोलल्यास. आज मात्र काळ बदलला आहे व बदलत्या काळानुसार आपलं आईवरचं प्रेम अपण मोठे होताच कमी झालेलं आहे. कारण बऱ्याच जणांची आई आज वृद्धाश्रमात दिसते. प्रेम हे फक्त लहानपणीच दिसतं. मोठेपणी आपल्याला आपली आई पाहिजे त्या प्रमाणात चांगली वाटत नाही. म्हणूनच वृद्धाश्रम. असं असलं तरी आपण आपल्या आईबद्दल अपशब्दाचे बोल ऐकत नाही. मोठेही झालो असलो तरी आणि आपण आईला वृद्धाश्रमातही ठेवलं तरी. याचं कारण आहे, आपलं आईवरचं प्रेम. आपली आई आपल्यासाठी मातृदेवोभवं असतं. अर्थात देवी असते. 

         आपली आई. आपली आई आपल्याला आवडते एका देवीच्याच रुपात. ती देवी, जिला आपण पाहिलेलं नाही. सारे पोशाख तिला आपण आपल्या कल्पनेनं परिधान करुन दिले. आपल्याला देवी चित्रपटातून सापडली. जिच्या अंगावर सोळा श्रृंगार आहेत. ती तोकड्या कपड्यानं नटलेली नाही. चांगला भरजरी पोशाख तिच्या अंगावर आहे. इकडून तिकडून, आलटूनपालटून पाहिलं तरी तिचं कोणतंच नैतिक अंग खुलं दिसत नाही. ती देवी आहे व देवीला आपण तोकड्या कपड्यात पाहातच नाही. कारण ती आपली संस्कृती आहे. तशीच आपली आई. आपली आईही आपल्याला आवडते व आपल्याला ती व्याभिचारी कापडात आवडत नाही. ती आपल्याला बंद कापडातच आवडते. असा कोणताच भारतीय पुरुष नसेल की त्याला त्याची आई भरजरी पोशाखात आवडत नाही. प्रत्येक भारतीयांना आपली आईही चांगल्या पोशाखात आवडते. कारण तिही आपली एक संस्कृती. अन् ज्या देशात आपली आई राहाते आपल्याला घेवून. तो देश आपलाच आहे, भारत देश व त्याचीही अशीच संस्कृती आहे व तिही संस्कृती महानच आहे. मग ती संस्कृती आपण तोकड्या कपड्यात का ठेवावी? हा यक्षप्रश्न कोणालाही नक्कीच पडू शकतो. जो आपल्या आईला व आपल्या मातृभुमीला मानतो. तिचा तिरस्कार करीत नाही. 

         भारत आपला देश आहे व आपल्या भारताची संस्कृती महान आहे. अशा या भारतात आपल्या आईला देवीचा दर्जा आहे व आपली आई आपल्याला शालीन पोशाखात आवडते. तसंच आपल्या मातृभुमीचंही असावं आणि आहेच. तसं विदेशात नाही. विदेशात मुल हे दहा वर्षाचं झालं की त्यांचे आईवडील त्याला सोडून देतात. कशासाठी तर आत्मनिर्भर करण्यासाठी. ज्याप्रमाणे पशूपक्षी हे  बाळाला जन्म देतात व सोडून देतात, ती थोडीशी मोठी झाली तर....... तसंच आहे विदेशी लोकांचं. कारण तेथील संस्कृती तशीच आहे. पशुगत जीवनासारखी. त्याचं कारण म्हणजे तेथील हवामान, परिस्थिती व वातावरण.

         विदेशातील वातावरण हे दमट आहे व तेथील वातावरण दमट असल्यानं अंगावर कोणतेच कपडे सहन होत नाहीत. शिवाय वातावरण दमट असल्यानं कपडे वेळोवेळी फाटतातच. ते कपडे कमी वेळात फाटत असल्यानं नवीन कपडे वारंवार घेता येत नाही. त्यामुळंच त्यांना कपडे फाटकेच परिधान करावे लागतात. घेवून घेवून कितीवेळेस घेणार कपडे. शिवाय दमट वातावरण असल्यानं व अंगावर कपडे घातले की अंगाला ते कसेतरी वाटत असल्यानं साधारणतः ती मंडळी अंगात कपडेच वापरत नाहीत. याचा अर्थ प्रत्येक स्री पुरुषांच्या अंगावर कपडे हे नसतातच किंवा अपुरे कपडे असतातच. शिवाय त्यांना तशा कपड्यात लाज वाटत नाही. कारण  त्यांनी आपली मुलं त्यागलेली असतात, पशुपक्षांसारखी. तसंच त्यांचं जीवनही पशुपक्षांसारखंच असतं. 

         कपडे......ह कपड्याबद्दल सांगायचं झाल्यास जिथं दमट हवामान, तिथं कमी कपडे वापरले जातात. हा प्रकृतीचा एक नियमच आहे. तसंच वाळवंटी प्रदेशात शरीराला त्रास होवू नये म्हणून पुर्ण अंगाला झाकणारे कपडे वापरले जातात. हाही एक प्रकृतीचा नियमच आहे. ती फॅशन नाही तर तो त्या त्या भागातील वातावरणाचा एक परिणाम. मग त्याच गोष्टीला फॅशन समजून आपण वागत गेलोच तर त्याला वातावरणातील बदल वा प्रकृतीचा नियम म्हणता येणार नाही. ते फालतूचं काम झालं, नव्हे तर ते जनावरांसारखं वागणं झालं. मानवी प्राणी हा काही पशुपक्षी नाही की तो पशुपक्षांगत वागेल? तो पशुपक्षांसारखा राहिल? आपल्या जीवनाला आपलं पशुपक्षांसारखं बनवेल? तसं पाहिल्यास वाळवंट प्रदेशातील भागात सुती व काळे कपडे लागतात. जे उष्णता शोषून घेतात. त्यातच तसे कापड इतर भागात अंगावर परिधान केले तर ती फॅशन नाही. त्यांचा अतितायीपणा आहे. तसंच ज्या भागात परिस्थितीला अनुरुप असलेले तोकडे कपडे वापरत असतील तर तिथं त्या त्या परिस्थितीनुसार ते कपडे चांगले असतांना तेच कपडे इतर सुसंपन्न भागात परिधान करीत असतील तर तोही प्रकार आततायीपणाचंच एक उदाहरणच आहे. ती फॅशन नाही. परंतु आपण तो प्रकार आपली एक फॅशन म्हणून स्विकारतो व वापरतो. ज्यातून अनैतिक, अनैसर्गिक कृत्यांना हवापाणी मिळत असतं. गुन्हेगारीला बळ मिळत असतं. सध्या भारत एक सुसंस्कृत देश असून त्याला एक प्रकारची संस्कृती आहे. त्यामुळंच भारतात जरी आज तोकडे कपडे वापरण्याची फॅशन आली असली तरी त्याला या देशात परवानगी नाही. आधीपासूनच या भारतात तोकडे कपडे वापरण्याची फॅशन नाहीच. 

         तोकड्या कपड्याबाबत सांगायचं झाल्यास तोकडे कपडे भारतातही वापरले जात होते. परंतु केव्हा? जेव्हा माणूस माकड अवस्थेत होता. त्याला कपडे म्हणजे काय? हेही समजत नव्हतं. जेव्हा तो झाडावरुन नुकताच खाली जमीनीवर आला होता. तेव्हा तो झाडाची पानं वा प्राण्यांची कातडीच अंगावर परिधान करायचा. तद्नंतर जेव्हा कापडाचा शोध लागला. तेव्हा माणसानं पुर्ण सीलबंध कपडे वापरणं सुरु केले. तरीही काही जाती व जमाती अशा होत्या की त्या जाती कमी कपडे वापरायच्या. त्याचं कारण होतं, दरिद्री. त्यांना पुरेसे अंगावर घालण्याइतपतही कपडे मिळत नव्हते. ते जनावरांचे कच्चे, सडलेले मांस खात असत. कंदमुळं, झाडांचा पाला खात असत. तसंच त्यांचं जीवन हे पशुसारखंच होतं. आजही काही आदिवासी जमाती अशा आहेत की ज्यांना अंगावर वापरण्याइतपत पुरेसे कपडे मिळत नाहीत. ते कमी कपडे वापरणारच. तसं पाहिल्यास त्यांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास वा त्यांचे जीवन जवळून पाहिल्यास त्यांचं जीवन हे पशुगतच असतं. ते किड्यामुंग्या, जनावरांचे सडलेले मांस खात असतात. मात्र आज भारतातील काही सुसंपन्न भागात, जिथं पैशाला काही कमी नाही. जिथं अंगावर वापरायला पुरेसे कापड घेता येवू शकतं. तिथं ही तोकडे कपडे वापरण्याची सवय आहे व ही सवय फॅशनच्या नावावर सर्रास सुरु आहे. ही पिढी त्याच आपल्या बिरादरीसारखी मोठमोठ्या रेस्टॉरेंटमध्ये जाते. दारुसारखे मादक पेय पिते व जनावरांचे भाजलेले मांस, त्याला तिखटमीठ लावून मोठ्या आवडीनं खाते आणि मादकता सहन न झाल्यानं पशुसारखाच व्यवहार करते. अर्थात बलात्कार, अनैतिक, अनैसर्गिक संबंध करते. आपली पत्नी दुसऱ्याला व दुसऱ्याची आपल्याला. हा पशुसारखाच व्यवहार असतो व हे पशुसारखंच वागणं असतं. हे कृत्य त्यांच्याबाबतीत बरोबर जरी असलं तरी भारतासारख्या सुसंपन्न व सुसंस्कृत संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही. शिवाय भारतात पुर्वी ठीक होतं की कापडं अंगावर परिधान करायला मिळायचे नाहीत. कारण गरिबी. परंतु आज काही भाग जर सोडले तर भारतात गरिबी नाही. मग तोकडे कपडे वापरुन आपल्या सुसंपन्न व सुसंस्कृत संस्कृतीला फॅशनच्या नावावर का बदनाम करावं? देशातील प्रत्येक जीवाला पशुसारखं का समजावं? हो, ठीक आहे, तुम्ही फॅशनच्या नावावर कमी कपडे वापरता? मोठमोठ्या रेस्टॉरेंटमध्ये जाता व जनावरांचे भाजलेले मांस, तिखटमीठ लावून खाता आणि दारुही पिता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही निरपराध असलेल्या व तुमचं रानटी जीवन न पाळणाऱ्या, न मानणाऱ्या मानवसंस्कृतीवर आपल्या मादकतेनं बलात्काराचे शिकार करता. हे काही बरोबर नाही. अन् जर तुम्हाला ते बरोबर वाटत असेल तर मानवी सुसंपन्न, सुसंस्कृत संस्कृतीत तुम्ही वावरु नये. ज्याप्रमाणे जनावरांचं अधिवास ठिकाण जंगल असतं. तसंच तुम्ही तोकडे कपडे परिधान करीत असल्यानं तुमच्याही अधिवासाचं ठिकाण हे वेगळंच असायला हवं. हे समजून आपलं ठिकाण कोणतं? हे तुम्ही ठरवायला हवं. तिथंच तुम्ही राहायला हवं. उगाचंच इतर भारतातील सुसंपन्न, सुसंस्कृत असलेल्या प्रदेशाकडं तुम्ही येवू नये व येथील सुसंपन्न आणि सुसंस्कृत असलेल्या पिढ्यांना तुम्ही तुमच्या फॅशनच्या नावाखाली बिघडवू नये. जेणेकरुन ही पिढी सुरक्षीत असायला हवी.

          महत्वाचं सांगायचं झाल्यास भारत हा सुसंपन्न व सुसंस्कृत देश राहिला आहे आधीपासूनच. जेव्हा या देशाला सुसंस्कृतपणा काय असतो, ते कळलं तेव्हापासून. आपली संस्कृती ही पशुसारखं राहाणं शिकवीत नाही. इथं बाळाला जन्म दिला जातो व त्यांचं संगोपन उत्तम पद्धतीनं केलं जातं. इथं फालतूच्या गोष्टीला थारा नाही. इथं माणूसकी शिकवली जाते व प्रत्येक बाळात सुसंस्कार भरला जातो. तेव्हा फालतूच फॅशनच्या नावाखाली तोकडे कपडे परिधान करुन आपला भारतात असलेला सुसंस्कृतपणा व त्यानुसार वागणाऱ्या सुसंस्कृत पिढीला बिघडवू नये व भारतातील सुसंस्कृत पिढीलाच नाही तर भारतालाही बदनाम करु नये, फॅशनच्या नावाखाली. कारण भारत हा महान आहे, आधीपासूनच आणि येथील संस्कृतीही आधीपासूनच महान आहे. यात शंका नाही. 

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या