इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंप
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/06/2026 :
इतिहासात सर्वात शक्तिशाली भूकंप कधी आणि कुठे झाला? १९६० रोजी चिली मध्ये इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंप झाला, ज्याची तीव्रता ९.५ होती. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे हवाई आणि जपान पर्यंत त्सुनामी आली. वाल्दिव्हियन भूकंप, ग्रेट चिलीयन भूकंप, हा आता पर्यंतचा सर्वात मोठा भूकंप आहे. ते वाल्डिव्हिया आणि प्वेर्टो मॉन्ट प्रदेशा जवळील चिलीच्या किनाऱ्यावर धडकले.
२२ मे १९६० रोजी दुपारी चिलीतील वाल्डिव्हियाला झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.४-९.६ होती. या भूकंपाचा जास्तीत जास्त कालावधी १० मिनिटे होता. यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामी लाटा चिली, हवाई, जपान, फिलीपिन्स आणि अगदी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पर्यंत पोचल्या. त्यानंतर २६ डिसेंबर २००४ रोजी हिंद महासागरात एक प्राणघातक भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.२ आणि ९.३ इतकी होती आणि हा २१ व्या शतकातील सर्वात विनाशकारी भूकंप मानला जातो. ११ मार्च २०११ रोजी जपान मध्ये झालेल्या तोहोकू-सेंदाई भूकंपामुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात समस्या निर्माण झाल्या आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ९.१ होती.
कॅनडातील व्हँकुव्हर ते उत्तर कॅलिफोर्निया पर्यंतच्या किनारपट्टीच्या भागात ८ ते ९.२ तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामीच्या लाटा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे अनेक शहरे बुडू शकतात. तीव्रतेच्या बाबतीत तो चिलीतील वाल्डिव्हिया भूकंपाइतका मोठा नसला तरी, तो अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागांना व्यापेल, जिथे पाच दशलक्षाहून अधिक लोक राहतात.
सौजन्य : तरुण भारत, नागपूर
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या