🟢 केरळच्या मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची राष्ट्रीय बैठक संपन्न 🔵 देशाच्या वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा


🟢 केरळच्या मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची राष्ट्रीय बैठक संपन्न

🔵 देशाच्या वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/06/2026 : केरळ राज्यातील मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मा.खा. राजीव प्रताप रूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीस समितीचे सदस्य म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते.

बैठकीत केरळ राज्यातील जलस्रोत व्यवस्थापन, पाणीटंचाई, हवामान बदलाचे परिणाम, भूजल समस्या आणि पूर नियंत्रण हवामान बदलामुळे पर्जन्यमान व तापमानातील होणारे बदल, वाढती लोकसंख्या तसेच पर्यटन क्षेत्रातील वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा झाली. याच बरोबर येथील इडुक्की धरणाचे व्यवस्थापन, सुरक्षितता, गाळ साचणे (Siltation) आणि पूर नियंत्रण यंत्रणेबाबत आढावा घेण्यात आला. तसेच धरणापासून लगतच्या भागातील कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम (CADWM) अंतर्गत कालवा विकास व जल व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.


जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जल नियोजन आणि भविष्यातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या