ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

 

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

आपल्या मधाळ आणि दैवी सुरांनी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचे ३१ मे २०२६ रोजी मुंबईतील राहत्या घरी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 

सुमन कल्याणपूर यांच्याविषयी महत्त्वाची माहिती :

जन्म व पार्श्वभूमी : सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील ढाका (सध्याचा बांगलादेश) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव 'सुमन हेमाडी' असे होते. 

गायकीची सुरुवात : महान कवी ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या गीतांमधून त्यांनी मराठी संगीतसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर गझलकार तलत महमूद यांनी त्यांचा आवाज ऐकून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळवून दिली. 

अजरामर गीते : त्यांनी केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, आसामी, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये हजारो गाणी गायिली. 'भातुकलीचा खेळ मांडिला' (मराठी चित्रपट - पसंत आहे मुलगी), 'रिमझिम झरती श्रावणधारा', 'निंबोणीच्या झाडामागे', आणि हिंदीतील 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे' ही त्यांची अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. भावपुर्ण श्रद्धांजली...!!

   ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या