🌹विचार सुमने🌹
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/05/2026 :
आपल्याला हवी असणारी गोष्ट बाहेरच्या जगात नका शोधू, तर तिला आपल्यातच शोधा. थोडं स्वतः वर प्रेम केल की सापडेल ती आपोआपच...!
आपण ज्या समाधानाचा शोध बाहेरच्या जगात घेतो, तो प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या आतच असतो.निसर्ग, नशीब आणि आयुष्यातील अनुभवांमधून मिळणारी खरी शांती बाहेर कुठे हरवलेली नसते, तर ती स्वतःला ओळखण्यात, आत्म्याशी जोडण्यात आणि स्वतःवर प्रेम करण्यात दडलेली असते.
जो माणूस स्वतःच्या मनात खोलवर उतरतो, स्वतःला समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधान अनुभवू शकतो.
©️®️ राजश्री (पूजा),
कोल्हापूर
संकलन : प्रविण सरवदे, कराड
.

0 टिप्पण्या