🛑 काँग्रेस पक्ष हा कधीही न संपणारा पक्ष आहे. पक्ष संपविण्याचा विचार कोणी करु नये - सातलिंग शटगार

 

🛑 काँग्रेस पक्ष हा कधीही न संपणारा पक्ष आहे. पक्ष संपविण्याचा विचार कोणी करु नये -  सातलिंग शटगार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/05/2026 : दिडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी आणि भारत देश स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस पक्ष हा महासागरा सारखा आहे. तो कधी ही संपणार नाही.संपविण्याचा विचार करणारे संपलेले आहेत. काँग्रेस पक्षाने भारत देशावर 70 वर्ष राज्य केलेआहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे.  विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपविण्याचा विचार कोणी करू नये. विरोधकांनी आपला वेळ वाया घालू नये.असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या  खासदार प्रणितीताई शिंदे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली एका वर्षभरात आपल्या लोकसभा मतदारसंघात एकदा नव्हे दोनदा -तीनदा प्रत्येक गावाना भेट देऊन सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामील होऊन व गावंच्या विकासाची कामे केली आहेत व करीत आहेत.लोकसभेमध्ये सर्वसामान्यांच्या हितासाठी, सामाजिक व विकासाच्या बाबतीत नेहमी आवाज उठवतात. व विविध प्रश्नावर निर्भीडपणे मुद्दे मांडतात. त्या तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांना जनाधार आहे. लोकांच्या प्रश्नाची जाण आहे. त्या स्वतःच्या कामामुळे निवडून येतात.  विरोधकांनी पक्ष संपणविण्याचा विचारही करू नये. व त्या भानगडीत पडून आपला वेळ वाया घालू नये. असा सल्ला जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिला.

खासदार प्रणितीताई शिंदे ह्या चांगले काम करीत असल्यामुळे विरोधकांना ते रुचत नाही. या कारणामुळे विरोधक नेहमी त्यांच्यावर टीका करीत असतात. परंतु प्रणितीताईनी कधीही टीके कडे लक्ष न देता. विकासा बरोबरच  विकासाभिमुख कामे  करीत आहेत. मोहोळ ते वळसंग या राष्ट्रीय महामार्ग साठी 740 कोटीचा निधी मा.नितिन गडकरी साहेबांना भेटून, पाठपुरावा केल्यामुळे सदर निधी मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी पक्षपात न करता कोण कोणत्या पक्षाचा आहे. हे न पाहता त्यांनी विकासासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ मा.नितीन गडकरी साहेब हे सोलापूर येथे आल्यावर 740 कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल काँग्रेस पक्षा तर्फे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करणार आहेत अशी माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष  सातलिंग शटगार  यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या