कल्याण परिमंडळ - 3 कडून रु. ३४ कोटीचे हेरॉईन जप्त


कल्याण परिमंडळ - 3 कडून रु. ३४ कोटीचे हेरॉईन जप्त

वृत्त एकसत्ता न्यूज 

ठाणे, प्रतिनिधी दिनांक 25/05/2026 :

ठाणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-३ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये किमतीच्या ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन जप्तीची कारवाई संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. 

समाजाच्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी उचललेले हे धाडसी पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे.

या संपूर्ण कारवाईमध्ये कल्याण-डोंबिवलीचे  पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांचे नेतृत्व विशेष ठरले. 

त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि अचूक नियोजनामुळे अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. 

समाजाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गुन्हेगारीविरोधात घेतलेली कठोर आणि आक्रमक भूमिका नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या