दृढनिश्चय आणि क्षमा हेच जगातील सर्वात मोठे शस्त्र
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/04/2026 :
सप्टेंबर 2004 मध्ये, जेव्हा ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले, तेव्हा त्यांनी खास नेल्सन मंडेला यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी मंडेला खूप वयोवृद्ध झाले होते आणि सक्रिय राजकारणापासून दूर होते, पण कलाम सरांसाठी ते जिवंत प्रेरणा होते.
भेटीपूर्वी कलाम सर रॉबेन आयलंड येथील त्या जेलची कोठडी पाहायला गेले, जिथे मंडेला यांनी त्यांच्या आयुष्यातील 27 वर्षे घालवली होती. त्या छोट्याशा कोठडीला पाहून कलाम सर खूप भावूक झाले.
त्यांच्या मनात विचार आला, एखादा माणूस इतक्या वेदना सहन करूनही मनात द्वेषाऐवजी प्रेम आणि क्षमा कशी ठेवू शकतो?
जेव्हा दोघांची भेट झाली, तो क्षण खूप खास होता. मंडेला यांनी कलाम सरांचे स्वागत अगदी जुन्या मित्रासारखे केले.
कलाम सरांनी त्यांना विचारलं, “मंडेला जी, तुम्ही इतकी वर्षं तुरुंगात होतात, तरी तुमच्या मनात तुमच्या शत्रूंविषयी कटुता का नाही?”
मंडेला यांचं उत्तर मनाला भिडणारं होतं.
“कलाम सर, जर मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही द्वेष माझ्यासोबत ठेवला असता, तर मी आजही खऱ्या अर्थाने तुरुंगातच असतो. खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी द्वेष मागे सोडणं गरजेचं आहे".
कलाम सर मंडेला यांच्या क्षमाशीलतेच्या विचारांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्या Indomitable Spirit या पुस्तकात मंडेला यांना ‘अदम्य साहस’ याचं प्रतीक म्हटलं. त्यांनी लिहिलं “अंधाराला अंधाराने नाही, तर प्रकाशानेच दूर करता येतं".
ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि नेल्सन मंडेला दोघांनीही शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास केला. एकाने विज्ञानाच्या बळावर देश सुरक्षित केला, तर दुसऱ्याने अहिंसेच्या मार्गाने राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
या दोन महान व्यक्तींची भेट आपल्याला शिकवते की, दृढनिश्चय आणि क्षमा हेच जगातील सर्वात मोठे शस्त्र आहेत.
जरा विचार करा मित्रांनो, 27 वर्षांचा अन्याय सहन करूनही मनात कटुता नाही आणि आपण? छोट्या-छोट्या गोष्टींवर वर्षानुवर्षं राग धरून बसतो, बोलणं बंद करतो, बदला घ्यायचा विचार करतो, पण खरं सांगायचं तर, त्या द्वेषाच्या तुरुंगात आपण स्वतःच अडकलेलो असतो.
आज आपण इतकी हिम्मत दाखवू शकतो का, की मंडेला आणि कलाम सरांच्या आठवणीत त्या एक व्यक्तीला मनापासून माफ करू, ज्याच्याबद्दल आपल्या मनात राग आहे?
जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, तर जरूर शेअर करा, कदाचित कोणाचं तरी मन आज मुक्त होईल. तुम्हीही माझ्यासारखे कलाम सरांना तुमचा रोल मॉडेल मानता का?
93 26 36 53 96

0 टिप्पण्या