विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/04/2026 :
आपण शिक्षित होण्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी शाळेत जातो. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान आपल्याला शाळेत मिळते; पण सुशिक्षित अर्थात सुसंस्कारित मात्र आपण घरात होतो.
आई-वडील, मोठी माणसे यांच्या कृतीतून आपण कितीतरी गोष्टी शिकतो. निरीक्षणातूनच त्या आपल्या अंगवळणी पडतात. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, अगदी झाडूला जरी पाय लागला, तर आपण पाया पडतो (कृतज्ञता/विनम्रता). पायाला तिढी घालून बसत नाही, पालथी मांडी घालत नाही (विज्ञान).
घरी आलेल्यांना विन्मुख पाठवत नाही. पाहुण्या महिला निघाल्या की हळद-कुंकू लावतो, ओटी भरतो (आदर). या गोष्टी कुठे लिहून ठेवल्या नाहीत, तर मोठ्यांचे अनुकरण करून त्या आपल्या सवयीच्या होतात.
अशा अनेक अलिखित गोष्टी मोठ्यांकडून शिका व संस्काराचा वसा पुढे न्या.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या