माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

 

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/04/2026 :

श्री. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आपल्या आराध्य दैवतांचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून आपले आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे वक्तव्य करून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री, रा. स्व. संघाचे नेते व सत्ताधारी पक्षाचे नेते हे सुद्धा उपस्थित होते. मात्र त्यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आणि हे अपमानास्पद कृत्य होत असताना त्यास विरोध न करता मूकपणे बसलेले रथी महारथी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्याच्या दृष्टीने

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ  यांच्या आदेशावरून व देशाचे नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  व सोलापूरच्या  खासदार प्रणितीताई शिंदे नेतृत्वाखाली,  सातलिंग शटगार (जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी) यांचे सूचनेनुसार काँग्रेस पक्षाचे तालुका /ब्लॉक/शहर अध्यक्षांनी धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी तहसील कार्यालय येथे निषेध व्यक्त करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे.

तरी सदर  कार्यक्रमास माळशिरस तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,सर्व सेलचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि काँग्रेस प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या