मोहा फाटा, समताभूमी, जामखेड, येथील निवारा बालगृहास सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/04/2026 : मोहा फाटा बीड रोड (समताभूमी) जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित विनाअनुदान तत्त्वावरील "निवारा बालगृह"( महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त) येथे माळशिरस तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे युवा नेते यशराज गिरीश शेटे यांनी रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 : 45 वाजण्याच्या सुमारास सदिच्छा भेट दिली.
जामखेड ते बीड रस्त्यावर जामखेड पासून सहा किलोमीटर अंतरावर मोहा फाटा येथे सौताडा घाटाच्या पायथ्याशी अनाथ, निराधार, वंचित, अन्याय, अत्याचार ग्रस्त, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ऊसतोड कामगार, वीट भट्टी मजूर, विधवा, परित्यक्ता, एकल महिला तसेच बालकांसाठी, लोककलावंतांच्या मुला मुलींचे वसतीगृह गत तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या निवारा बाल गृहातील मुला मुलीं बरोबर सदिच्छा भेटीमध्ये संवाद साधला. त्याचबरोबर निवारा बालगृहासमोर नव्याने तीन मजली इमारत बांधकाम सुरू असलेल्या भव्य वास्तुची अर्थात "आईचं घर" ही पाहिले.


0 टिप्पण्या