भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान अंतर्गत माळशिरस येथे बैठकीचे आयोजन

 


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान अंतर्गत माळशिरस येथे बैठकीचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/04/2026 : 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर संघटन सृजन अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक  07/04/ 2026  रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह  येथे मीटिंग आयोजित केलेली आहे.


या मिटींगला AICC प्रदेशचे निरीक्षक यशराज पारखी, DPCC निरीक्षक भाऊसाहेब आसबे, सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक मोहन जोशी (माजी आमदार), सोलापूर जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार  तसेच वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

 या मीटिंगमध्ये काँग्रेस पक्षाचे विविध सेल च्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या मिटींगला उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या