🔰बुवा तिथे बाया

 🔰बुवा तिथे बाया

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

अकलूज दिनांक 03/04/2026 :

कोंग्रेस पक्ष रिंगणासाठी भाई जगतापांनी प्रसिद्ध केला होता. परंतु आचार्य अत्रेंच्या काळापासून कोंग्रेसी नेत्यांच्या रगेल आणि रंगेल कथा उभ्या महाराष्ट्राला ज्ञात होत्या... 

ती परंपरा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने सुद्धा चालवली होती. अमर्याद सत्ता ही अमर्याद संपत्तीच मिळवून देत नाही तर अमर्याद प्रमाणात अनैतिक वर्तन करायला पण प्रेरित करते आणि हे पवारांच्या हाताखालच्या मंडळींच्या वर्तनातून वारंवार दिसून येते. स्वतः पवार मात्र सत्ता आणि पैसा यावरील पकड घट्ट ठेवत असत. त्यांच्या वैयक्तिक फार भानगडी नसतील आणि असल्या तरी त्या कायम पडद्याआड रहातील याची काळजी घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे निश्चित आहे. 

काही प्रमाणात शिवसेना सुद्धा या बाबतीत सैल सुटलेली होती. आणि भाजपात सुद्धा मुंडे महाजन द्वयी आणि त्यांचे तत्कालीन अन्य शिलेदार त्या दृष्टीने कोरडी किंवा सज्जन म्हणवता येईल अशी नव्हतीच.  

सामाजिक पातळीवर पुरुषार्थाची व्याख्या त्याचा रगेलपणा, पैसे कमावण्याचे सामर्थ्य याच्या जोडीला त्याच्या भोवती पडणारा सुंदर ललनांचा वेढा या तीन मुद्द्यांभोवती फिरते हे कटू सत्य आहे. 

अशीच अमर्याद संपत्ति , सत्ता आणि स्त्रियांचा वेढा हे दृश्य तुम्हाला धर्माचार्य म्हणवणार्‍या मंडळींच्या बाबतीत सुद्धा दिसून येतेच. 

अर्थात गुरुपरंपरेतून आलेल्या शिस्तबद्ध गुरु आणि महाराज मंडळींच्या बाबतीत हे संभवत नाही कारण ते ज्या संप्रदायातून आलेले असतात त्या संप्रदायाच्या सर्वोच्च पिठाचे त्यांच्यावर लक्ष असते. 

परंतु जे स्वयंघोषित आणि स्वयंप्रेरित महाराज लोक असतात त्यांना असा कोणताही विधिनिषेध नसतो. ते करतील ती पूर्व असते आणि त्याचा फायदा घेऊन ही मंडळी सुद्धा सत्ता , पैसा आणि स्त्रिया यांचा मनसोक्त उपभोग घेतात. 

काही स्वतःहून जाऊन आपले शरीर, पैसा किंवा सत्तेचे सामर्थ्य अर्पण करून त्यांच्याकडून त्या बदल्यात काही पट अधिक लाभ मिळवतात. काही खरोखरच श्रद्धेने त्यांच्याकडे जातात आणि त्यांचे शोषण होते. स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक स्त्रीला सहावे इंद्रिय असते त्यामुळे आपण ज्या महाराजाच्या भेटीला आलो आहे त्याची आपल्याकडे बघण्याची नजर कशी आहे हे कोणतीही बाई एका मिनिटात ओळखते. 

त्या नंतर सुद्धा जर ती त्याच्याकडे जात असेल वारंवार भेटत असेल तर शरीरसुखाच्या बदल्यात त्याच्याकडून खूप मोठा लाभ संभवत असतो आणि त्यामुळे ती त्याच्याकडे जाते हे 100 % सत्य आहे. 

जिला आपले शरीर आपले चारित्र्य प्रिय असते ती महाराजाची नजर विकृत आहे हे लक्षात आले की परत त्याच्याकडे जात नाही. नवर्‍याने कौतुक केले तरी त्याची नजर चांगली नाही मी येणार नाही हे स्पष्ट सांगते. 

पण जी तरीही जाते तिला भविष्यात काय होणार हे माहिती असते आणि त्याबदल्यात मला या महाराजाकडून काय काय उकळायचे आहे याचे सुद्धा गणित तिने व्यवस्थित बसवले असते. 

राजकीय नेते आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्या हे प्रकरण सुद्धा कमी अधिक प्रमाणात असेच्च असते. 

आणि दोन्ही प्रकरणात जोवर अपेक्षित देवाण घेवाण योग्य पद्धतीने सुरू असते तोवर भांडे वाजत नाही. परंतु महाराज / राजकीय नेता याच्या अपेक्षा वाढल्या आणि संबंधित स्त्रीने नकार दिला किंवा उलट संबंधित स्त्रीच्या मागण्या वाढल्या ज्या महाराजाला पूर्ण करणे शक्य झाले नाही की अध्याय क्रमांक दोन सुरू होतो. 

जो असंतुष्ट असतो तो धमक्या देणे , शिवीगाळ करणे या पातळीवर उतरतो तरीही समोरचा बधत नसेल तर चारित्र्यहनन पातळीवर प्रकरण पोचते. जो या खेळात आता सहन करणारा असतो तो समोरच्या व्यक्तिला जिवानिशी संपवण्याची ऊचापत सुद्धा करू शकतो. 

हा दूसरा टप्पा सुरू झाला की प्रकरण बाहेर पडून षटकर्णी होते. तोपर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप असेच असते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या खेळाकडे बघणारे संबंधित सरकारी अधिकारी आणि पोलिस यांना सगळे काही माहिती असते. परंतु त्यांचे हात आणि डोळे योग्य पद्धतीने बांधून ठेवलेले असतात. अश्या लाभार्थी मंडळींची सुद्धा हाव वाढली तरी प्रकरण षटकर्णी होते. 

थोडक्यात हा सगळा सिद्ध साधकांचा खेळ असतो.  प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका आपण खेळत असलेला खेळ आणि त्याचे मिळणारे फळ याची पूर्ण जाणीव असते. कुणाचीही लायकीपेक्षा अधिकची अपेक्षा वाढली की मग आणि मगच गौप्यस्फोट होतात.  ज्यांची या खेळात सहभागी होण्याची इच्छा नसते त्यांना यात न घेण्या इतपत परिपक्वता ज्यांच्याकडे असते तेच या खेळात दीर्घकाळ टिकू शकतात. ज्यांच्यात ही परिपक्वता नसते ते उघडे पडतात. मग बलात्काराचे आरोप , ते सिद्ध होणे असे सगळे घटनाक्रम असतात. 

कायद्याचे म्हणाल तर न्याय देवतेचे डोळे बांधलेले आहेत आणि आपल्या देशातील न्यायदेवतेच्या एका हातात तराजू दिला असून तलवार असलेल्या हातात रेशमी शेला ठेवला आहे. या शेल्याला जो जितके अधिक कुरवाळेल न्यायदेवता तितकी प्रसन्न होते. 

खूप दीर्घकाळ खटला चालवणे हे सुद्धा या प्रसन्नपणाचेच लक्षण असते. 

आपल्याकडे भानगडबाज नेत्यांची यादी मोठी आहे, त्यापेक्षा काकणभर मोठी यादी भानगडबाज बाबांची आहे. दोघे एकमेकांना पूरक असतात आणि म्हणून दोघे एकमेकांना सांभाळतात. 

हा संपूर्ण लेख हिंदू बाबांवर आहे असे समजू नका.... अन्य धर्मात सुद्धा अशी मंडळी असतात आणि त्यांची कार्यशैली सुद्धा भिन्न नसते. 

लायकी नसलेल्या माणसाच्या हातात अमर्याद सत्ता गेली की तो असा बिघडतोच हे वैश्विक सत्य आहे. 

लोकशाही राज्यपद्धतीत जात , पात , चेहरा आणि पक्ष बघून मतदान करणारे लोक उमेदवाराचे वास्तविक मूल्यांकन करताच नाहीत त्यामुळे राजकारणात असले किळसवाणे चारित्र्य असणारे लोक येऊन आपल्या डोक्यावर मिरे वाटतात.

आणि धर्माच्या प्रांतात हिंदू धर्माचे पायाभूत सिद्धान्तच माहिती नसणारे नागरिक असल्यामुळे ते सुद्धा अमर्याद सुख मिळवण्याच्या हव्यासात आपले सर्वस्व या बाबा महाराज मंडळींच्या चरणी अर्पण करतात. 

व्यक्तीच्या गुणांचे मूल्यांकन न करता मतदान करणारा समाज आणि केवळ धर्माचार्याचा फॅन्सि ड्रेस घातल्यामुळे त्याला महाराज समजणारा अल्पबुद्ध्यांक धारी सामान्य समाज यामुळे या सगळ्या स्वार्थी आणि कुवत नसणार्‍या लोकांचे फावले आहे.  

खरात प्रकरणात महाराज आणि राजकारणी यांनीच युती केल्याने अनाचाराच्या सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. 

राजकारणी / महाराज हा स्वार्थी असू शकतो 

सामान्य स्त्री / पुरुष सुद्धा स्वार्थासाठी सर्वस्व अर्पण करण्याइतका मानसिक दृष्ट्या कमकुवत असू शकतो. 

हे दोन सत्य मेंदूत कोरून ठेवा... 

दान सुद्धा सत्पात्री करा हे सांगणारी आपली संस्कृती आहे आणि याच संस्कृतीत अश्या महाराजांच्या नादाला लागणारे स्त्रीपुरुष हे वास्तवात आत्मिक पातळीवर अधःपतित असतात आणि त्यामुळे त्यांना यात काहीच गैर वाटत नाही.. 

सगळीकडे बोंबाबोंब झाल्यावर अनेक मंडळी आम्ही कसे पीडित आहोत आणि आमचे कसे शोषण झाले आहे यावर बोलताना दिसतील परंतु सगळीकडे बोंबाबोंब होईपर्यंत सगळेच गप्प बसले होते / बसवले गेले होते. 

आता शेकड्यांनी किस्से बाहेर पडतील कारण घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. 

सर्वसामान्य / पापभीरू अश्या सज्जन लोकांनी यातून काय बोध घ्यायचा...???

आपल्या लायकीच्या इतकेच पाय पसरा. आकाशालाथ गवसणी घालण्याचे स्वप्न बघण्यापूर्वी आपल्या पंखातील बळ जरूर तपासा. कोणताही राजकीय नेता / किंवा बाबा याच्या हवेच्या बळावर आपण उंच उडू शकू हा भ्रम मनात निर्माण झाला असेल तर हा बाबा / राजकीय नेता आपली वार्‍यावरची वरात सुद्धा काढू शकतो हे मेंदूत कोरून ठेवा...... 

ज्यांच्यात हे धाडस नसेल आणि यश / संपत्ति यासाठी वाट्टेल ती किंमत चुकवण्याची तयारी नसेल त्यांच्यासाठी या फक्त चघळण्याच्या गप्पा आहेत यापलीकडे त्यांचे मूल्य नाही.

सुजित भोगले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या