विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/04/2026 :

आपले आई-वडील आपले संगोपन करतात, आपल्याला घडवतात, आपल्यावर संस्कार करतात, आपली काळजी घेतात. त्याचा प्रत्येक श्वास आपल्यासाठी असतो, आपण त्यांचा ध्यास असतो. 

अशा वेळी आपणही त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची अवज्ञा करणे, न सांगता घरातून बाहेर पडणे, उशिरापर्यंत बाहेर थांबणे, उलट बोलणे वगैरेसारख्या गोष्टी निश्चितच चुकीच्या आहेत.

मुलांनो, आई-वडिलांना समाधान वाटेल, आनंद होईल असे आपले वर्तन असावे. शाळेत किंवा समाजात वावरताना शिक्षकांच्याकडून वा इतर लोकांच्याकडून तुमच्याबद्दल चांगले ऐकायला मिळाले तर त्यांना किती आनंद होईल!

स्वतः आनंदात राहून इतरांना आनंद देण्यात एक वेगळाच आनंद असतो, तो मिळावा.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या