एरंडे 卐 तोडकर शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/04/2026 :
कै. नारायण रामचंद्र एरंडे यांचे नातू, सौ. नंदा व श्री हनुमंत नारायण एरंडे, राहणार पारगाव सुद्रिक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव अविनाश आणि चि. सौ. कां. विजया (कै. शंकर लक्ष्मण तोडकर यांची नात, कै. निर्मला व कै. चंद्रकांत शंकर तोडकर, राहणार पानोली, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर यांची द्वितीय कन्या) यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी संपन्न झाला.
विवाह सोहळ्याचे सोपस्कार पार पडण्यापूर्वीच नववरवधूंच्या लग्न सोहळ्याप्रत्यर्थ उभयतांचे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विविध सामाजिक, शैक्षणिक धार्मिक आश्रम ,सेवाभावी संस्थांना रोख आर्थिक मदत देणगी स्वरूपात वाटप करून लग्नविधीसाठी नव वधू वर स्टेजवर गेले.
एरंडे मळा (मोटेवाडी) पारगाव सुद्रिक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उभय पक्षाकडील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरीय मान्यवरांनी उपस्थित राहून नववधुवरांना शुभ आशीर्वाद दिले याप्रसंगी श्री 108 सदाशिव वेळापूरकर महाराज, यजुवेंद्र दानवे महाराज आष्टी, आमदार विक्रम पाचपुते, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, युवा नेते यशराज गिरीश शेटे, इत्यादी उपस्थित होते.

0 टिप्पण्या