या देशात जगातील सर्वात मोठी नोट, त्यातून भारतात काय विकत घेता येते ?

 

या देशात जगातील सर्वात मोठी नोट, त्यातून भारतात काय विकत घेता येते ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/04/2026 :

जगात इराण आणि व्हेनेझुएलासारखे आर्थिक संकटात सापडलेले देश जगात सर्वात मोठ्या चलनाच्या नोटा जारी करतात. इराण येथे एक कोटी रियालची नोट अस्तित्वात आहे. ही जगातील सर्वाधिक मुल्याची नोट आहे.

Largest banknote in the world:

जगात अनेक देशात वेगवेगळ्या मुल्यांच्या नोटा प्रचलित आहेत. परंतू तुम्हाला माहिती आहे का एक असाही देश आहे. जेथे एक कोटीची नोट देखील चलनात आहे. भारतात सर्वाधिक मुल्याची २००० रुपयांची नोट चलनाच्या बाहेर काढण्यात आली आहे. आणि आता ५०० नोट सर्वात जास्त मुल्यांची आहे. अशा एका देशात १ कोटीची नोट जारी केलेली आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, परंतू या मागे त्या देशाची खराब आर्थिक स्थिती आणि महागाई कारणीभूत आहे. चला तर आज पाहूयात. जगातील कोणत्या देशात सर्वात मोठी नोट चलनात आहे. त्या नोटे भारतात काय विकत घेता येते हे देखील पाहूयात..

या देशात आहे सर्वात मोठ्या चलनाच्या नोट

इराण आणि व्हेनेझुएला या देशांत जगातील सर्वात मोठ्या चलनाच्या नोटा आहेत. इराणमध्ये एक कोटीचा रियालची नोट चलनात आहे. ही जगातील सर्वात मोठ्या मुल्याची नोट आहे. व्हेनेझुएला सरकारने देखील महागाईचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या मुल्याच्या नोटा जारी केल्या आहेत. साल २०२१ मध्ये व्हेनेझुएलात २ लाख, ५ लाख आणि १० लाख बोलिवरच्या नोटा जारी केल्या आहेत.हे पाऊल यासाठी उचलले आहे की लोकांना दैनंदिन जीवनात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घ्यायची गरज लागू नये. ही रक्कम जरी ऐकायला मोठी वाटत असली तरी त्याची किंमत खूप कमी आहे. एक कोटी इराणी रियालची किंमत केवळ ७ डॉलर किंवा ६५० भारतीय रुपयांच्या बरोबर आहेत. एवढ्या मोठ्या किंमतीच्या नोटेला भारतात चालवले तर यातून भारतात खूप कमी सामान खरेदी केले जाऊ शकते.

महागाईने बिघडली, इराण आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था

इराणच्या सर्वांत मोठ्या एक कोटी रुपयांची नोट काढण्यामागे महागाई आणि कॅशची कमी आहे.‌ इराणच्या सेंट्रल बँकचे म्हणणे आहे की कॅशच्या कमतरतेमुळे कमी होऊ नये म्हणून ही एक कोटीची नोट बाजारात आणली आहे. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था देखील अनेक वर्षांपासून संकटात आहे. येथील करन्सी सातत्याने कमजोर होत गेली आहे, आणि महागाई एवढी वाढली पैशांची किंमत वेगाने घसरली. परिस्थिती इतकी बिकट झाली ती सामान खरेदी करण्यासाठी गोणीभरुन नोटा घेऊन जावे लागत होते. परंतु त्या बदल्यात मोजक्याच वस्तू खरेदी करता येत होत्या. तेल संपन्न देश असून आर्थिक विस्कळीतपणा, निर्बंध आणि इतर कारणाने व्हेनेझुएलाची स्थिती सातत्याने ढासळू लागली. त्याचमुळे येथील सरकारला वारंवार मोठ्या नोटा जारी कराव्या लागल्या.

भारतात या मोठ्या नोटांनी काय खरेदी करता येते?

इराणची सर्वात मोठी नोट एक कोटी रियालची नोट आहे. मात्र, या नोटेची किंमत भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमी मानली जाते. जर आताच्या हिशेबाने इराणच्या एक कोटी रियाल करन्सीला भारतीय रुपयात बदलले तर इराणचे एक कोटी भारतात केवळ ६५० रुपयांच्या बरोबर होतात. या रुपयात खूपच कमी वस्तू भारतात खरेदी करता येतील.‌

एवढ्या मोठ्या किंमतीच्या नोटांची का होते छपाई?

आर्थिक तज्ज्ञांनुसार जेव्हा कोणत्याही देशात महागाई प्रचंड वाढते तेव्हा तेथील करन्सीची किंमत घसरु लागते. अशा छोट्या रकमेच्या नोटांना काही किंमत राहात नाही. सरकारला मोठ्या नोटा छापाव्या लागतात. 'इराण' याचे मोठे उदाहरण आहे. यात भारताने देखील १९३८ मध्ये आणि नंतर १९५४: मध्ये १० हजाराची नोट जारी केली होती. मात्र यांना १९४६ आणि १९७८ मध्ये बंद करण्यात आले होते.

सौजन्य : tv9मराठी

संकलन : यशवंत वाघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या