"देशातील शेतकरी आज गंभीर संकटात आहे"- खासदार धैर्यशील मोहिते पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/03/2026 :
"देशातील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना देशातील शेतकरी आज गंभीर संकटात आहे". असे मत अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रसंगी लोकसभेत कृषी विभागाच्या मागण्यांवर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती मांडत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,उत्पादन खर्च वाढतोय, पण उत्पन्न नाही.योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.हमीभाव केवळ कागदावर राहिला आहे. शेतीसाठीचे सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत,त्यामुळे शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. त्यातच इराण-इस्राईल-अमेरिका युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम होऊन केळीसह इतर फळे भाजीपाला यांचे दर कोसळले आहेत. फळपिकांच्या बाजारभावात सरकारने हस्तक्षेप करण्याबरोबरच निर्यात सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.तसेच करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

0 टिप्पण्या