मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/03/2026 :

परस्परांमधील नाते हे नेहमी घट्ट असावे असे प्रत्येकाला वाटते. काही जन्मानेच मिळालेली रक्ताची नाती असतात तर काही जोडलेली असतात.

कोणाशी नाते जोडणे एकवेळ सोपे पण ते टिकवणे म्हणजे एक परीक्षाच असते. एकमेकांविषयी वाटणारे प्रेम, श्रद्धा, निष्ठा व सर्वात महत्वाचे म्हणजे विश्वास. नाती एकतर्फी टिकत नाहीत.

यासाठी कोणीही काही सांगितले तरी विश्वास न ठेवणे. प्रत्यक्ष क्वचित कटु अनुभव आला तरी दुर्लक्ष करणे व आपल्या मनात कोणतीच कटुता न ठेवणे गरजेचे असते. अर्थात त्यासाठी समोरूनपण तसाच प्रतिसाद मिळणे खूप महत्वाचे.

आजचा संकल्प

ज्या गोष्टींमुळे रक्ताच्या नात्यात सुद्धा अंतर पडण्याची  शक्यता असते अशा गोष्टींना महत्व न देता नाती महत्त्वाची हे लक्षात घेऊ व नाती टिकवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या