विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/03/2026 :
परीक्षा जवळ आली की आपल्याला देव आठवतो. तसे देवाचे रोज स्मरण करून सकारात्मक विचारांचा अंगीकार करणे कधीही चांगले पण आपण गरजेपुरता देवाला आठवतो.
देवा मला पास कर, देवा माझा पहिला नंबर येऊ दे, मी पेढे वाहिन वगैरे सारख्या प्रार्थना व नवस चालू असतात. तुम्ही अभ्यास न करता, काहीच प्रयत्न न करता यश येणार आहे का?
देव काही देत नाही. आपले प्रयत्न, जिद्द, चिकाटी, सराव, यामुळे आपण यशाच्या दिशेने वाटचाल करतो. आपण काहीच केले नाही तर यश कसे मिळेल?
प्रयत्नांती यश मिळते हे त्रिवार सत्य लक्षात ठेवा व कामाला लागा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या