मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/03/2026 :
आपले शरीर आतमध्ये कोणतीही दूषित गोष्ट ठेवून घेत नाही. हवेद्वारे काही दूषित आत गेले तर सर्दी-पडसे होते, ताप येतो, डोके दुखते, अंग दुखते. अन्न-पाण्याद्वारे काही दूषित गेले तर उलट्या-जुलाब होतात.
कशाही प्रकारे शरीर ते दूषित बाहेर काढते तेंव्हाच बरे वाटते. मात्र मनाचे तसे नसते. मनात कितीही दूषित विचार आले तरी मन त्याचा स्वीकार करते. सकारात्मक विचार कमी पण नकारात्मक विचारांचे कायमच स्वागत असते.
आपण रोज अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून शरीराची स्वच्छता करतो. खरी गरज आहे मनाच्या स्वच्छतेची व शुद्धीकरणाची. सद्विचार ऐकून, त्यांचे आचरण करणे, जाणीवपूर्वक नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
आजचा संकल्प
आपण सर्वजण शरीराचे आरोग्य जपतो तसे मनाचे आरोग्य जपू . मनात स्वच्छ, शुद्ध व सात्विक विचारांची पेरणी करू व मानसिक आरोग्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या