💢 ६.४ तोळे सोन्याचे दागिन्यांच्या जबरी चोरी प्रकरणी आरोपींना चार दिवसात अटक 🔷 अकलूज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी



💢 ६.४ तोळे सोन्याचे दागिन्यांच्या जबरी चोरी प्रकरणी आरोपींना चार दिवसात अटक

🔷 अकलूज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे

अकलूज. दिनांक 10/02/2026 :

अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे  प्रकटीकरण पथकाने कौतुकास्पद कारवाई करून चार दिवसात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली. 

दिनांक ०४/०२/२०२६ रोजी रात्री ०९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मच्छिंद्र लोखंडे (रा.अकलूज) भाच्यासह  मोटार सायकल वरुन घरी जात असताना तांबोळी वसाहत अकलूज रोडवर तिघांनी अडवून  शिवीगाळी व झटापटी करुन फिर्यादीच्या गळयातील चैन, व उजव्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट व डाव्या हातातील एक अंगठी दमदाटी करुन जबरदस्तीने काढून घेवुन फिर्यादीस धक्का देवुन युनिकॉर्न गाडीवर बसुन निघुन गेले. तीन तोळे वजनाची सोन्याची चैन, तीन तोळे वजनाची सोन्याचे ब्रेसलेट, एक साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा अंदाजे ३,२२,५००/-रु किंमतीचे ६.४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यांची जबरदस्तीने चोरी केले होते. त्यावरुन अकलुज पोलीस ठाणे गुरन नंबर ४६/२०२६ बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा अकलुज शहरामध्ये एक सेवानिवृत्त वयस्कर व्यक्तीचा बाबत घडलेला असल्यामुळे सोलापुर ग्रामिण पोलीस दलाचे पोलीस आधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अकलुज पोलीस ठाणे येथील तपास पथकाला गुन्हयाचे संबंधाने सुचना दिल्या तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी निवडणुक बंदोबस्त सारख्या महत्वाचा बंदोबस्त चालु असताना आपल्या स्तरावर टिम तयार करुन अकलुज पो. ठाणे तपास पथकाचे मदतीसाठी उपलब्ध करुन दिली. यामुळे सीसीटिव्ही व सायबर तात्रिंक माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन इसम नामे १) ज्ञानतु शरद मांडवे राहणार मांडवेवस्ती. श्रीपुर ता. माळशिरस २) परमेश्वर नागनाथ लौखडे राहणार यमाईनगर, श्रीपुर ता. माळशिरस ३) सत्यजित अनिल लौढे राहणार माळीनगर तालुका माळशिरस यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यांचेकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी केलेला एक तीन तोळयाचे चैन, एक तीन तोळ्याचे ब्रासलेट, एक साडे चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा अंदाजे ३,२२,५००/-रु किमंतीचे ६.४ तोळे वजानाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोसई कदम करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी, (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण),  प्रितम यावलकर (अपर पोलीस अधीक्षक) संतोष वाळके  (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांचे मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार सुहास शिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, दत्ता खरात, विनोद साठे, रणजित जगताप, पंडीत गवळे, बबलु गाडे, सायबर शाखा सो. ग्रा. चे सोनकर, नेटकरी यांनी कामगिरी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या