विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 02/02/2026 : सध्या सर्वत्र अती वजन ही समस्या झाली आहे. म्हणजे लहान बाळ गुटगुटीत असावे म्हणून पौष्टिक गोष्टी खावू घालणे, गुटी उगाळून देणे हे पूर्वी पासून चालू आहे. अशी बाळे कणखर व बळकट होतात.
मोकळ्या मैदानात मैदानी खेळ, भरपूर व्यायाम, घरी बनवलेला सकस आहार, मोकळी हवा, तणावमुक्त जीवन यामुळे मुलांची मानसिक, शारीरिक, भावनिक निकोप वाढ होत होती.
मुलांनो, आता नेमकी उलट परिस्थिती आहे. आई-वडील कामानिमित्त बाहेर, मैदानाचा अभाव, बाहेरचे पिझ्झा बर्गर सारखे पदार्थ. त्यामुळे वजन जास्त वाढते आहे. प्रमाणापेक्षा जास्त वजन आरोग्याला हानिकारक आहे.
वेळीच सावध व्हा! सुदृढ व्हा, कणखर रहा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या