दादा - सुनेत्रा आणि कराडचा प्रीतीसंगम
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 01/02/2026 :
झालं का तुमचं सगळं विश्लेषण करून? पक्ष विलीन होणार, कोण म्हणतं न्हाय, कोण म्हतंय न्हाय. आख्खी राष्ट्रवादी दादाविना विस्कटली असताना सुनेत्रावहिनी आत्ता का यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला कराडच्या प्रीतीसंगिमावर नतमस्तक व्हायला येणार आहेत. याचा अजीत पवार यांचा काय संबंध आहे? आणि बरोब्बर याच ठिकाणी वाहिनी का येत आहे??
क्लिष्ट गोष्ट, सोप्प्या शब्दात !
अजितदादाच्या जाण्यानंतर साऱ्यांनी कवित्व पाजळले. अनेकांनी भले मोठठे भाषण - लेख - काव्य रचले.
मात्र
दादाची अगतिकता ते जाई पर्यंत कोणालाच कळली नव्हती.
मुळात,
अजीत पवार
हा माणूस होता, त्याला उगाच परफेक्ट म्हणून यंत्र बनवू नका. त्याला पण भावना होत्या.
राष्ट्रवादी प्रबळ होत चालली होती. पण दादाचं अस्तित्व थोडं झुकत चाललं होतं.
त्यातच
"एका वाक्यानं" दादावर आरिष्ठ कोसळलं..... नाय नाय मुद्दाम कोसळवलं गेलं.
घंटा, एक वाक्य ( जे पूर्ण बरोब्बर आहे ) चुकलं त्यावरून कुंभाड उडलं. अश्या वेळी मदत करायला
ना काका
ना बहीण
ना मंत्री
ना खासदार
ना आमदार
ना नेते
दादाच्या रक्षणार्थ कोणी कोणी आलं नाही.
*एकटा पडलेला दादा मी पाहिलाय*
दादा, सगळ्या बाजूने एकटा पडला होता. कोणाकडे जाऊ, झाली चूक ती मान्य करू? असं त्यांना झालं होतं.
त्यावेळी त्यांना काका आठवले नाहीत
( वरील वाक्यावर अनेकांचा अक्षेप असणार आहे )
बाप गेलाय, आईला राजकारण तितकंस कळत नाही.
अश्या वेळी कोणाच्या कुशीत जाऊन गुडूप्प व्हावं?
दादाने,
कोणत्या पवारांची कबर शोधली नाही तर त्यांनी थेट सातारा जिल्ह्यातील कराड येथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्या प्रीतीसंगामाची निवड केली.
इतका हतबल दादा
मी कधीच पाहिला नव्हता.
अजीत पवारांचे आत्मक्लेश आंदोलन म्हणून ते पुढे खूप गजले.
( मी याच्या साक्षीदार आहे. कारण त्याच्या आदल्या दिवशी दादानं त्याच्या मानेवरची चमखीळ काढली होती, हे मी कोणत्या डॉक्टरकढे किती वाजता लिहू शकतो. )
एकूणच काय तर,
अजीत दादा पक्षीय राजकारणात असो की कौटुंबिक कलहात असो जेंव्हा एकटे पडलेले असोत त्यांना आधार देणारे ना कुटुंबात, न्क पक्षात कोणीही नसे.
म्हणूनच,
अत्यंत मनोवीकासाच्या प्रक्रियेतील शेवटचं पाऊल म्हणून
"स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी"
निवडली.
अजीतदादा,
साऱ्यातून हतबल होते तेंव्हा ते महाराष्ट्रातील ठिकाण निवडत होते ते मी दादाच्या सोबत अनुभवलं आहे.
*दादाची बायको आज पुन्हा इथंच का?*
पक्षाचं, जाती-धर्माचं इतकंच काय कुटुंबात कलह लावून झालाय?
"जिसका कोई नही, उसका तो खुदा हैं यारों"
हे आपलं तुम्हाला लवकर समजेल म्हणून.
सुनेत्रा वाहिनीने चार्ज घेतलाय.
आज तिच्या पाठीशी कोण आहे?
कुटुंब,
पक्ष?
मंत्री - खासदार- आमदार
नेते - उपनेते?
कोण? हे कोणीच सांगू शकत नही.
अश्या वेळी, ज्या समाधीने अजीतदादांना पुन्हा उभारण्याची प्रेरणा दिली
तेच
ठिकाण निवडून माथा ठेवणं, हे वहिनींन निवडलं असेल तर
"विनस्मयक झालेल्या ज्या जागेवर दादा शांत झाले" त्या जागेची
वहिनींनी योग्य निवड केलीय.
दीपक प्रभावळकर
9527403232
0 टिप्पण्या