⭕ माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांचेही लाचेच्या मागणीच्या प्रकरणात फिर्यादी मध्ये नाव
💢 लाच प्रकरणा मध्ये नवा ट्रिस्ट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/02/2026 :
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांच्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली असल्याचे सुंदरराव नागटिळक यांनी केल्याचे फिर्यादीत नमूद असल्यामुळे आता गटविकास अधिकारी पांढरे यांचे कारवाई होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. माळशिरस पंचायत समिती लाच प्रकरणा मध्ये नवा ट्विस्ट समोर आला असून बीडीओ यांच्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यामध्ये लाचखोर सुंदरराव उत्तम नागटिळक याने स्वतःसाठी पाच हजार रुपये आणि बीडीओ पांढरे यांच्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आले असल्याचे माळशिरस पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या नव्या ट्विस्ट मुळे पंचायत समिती येथे उलट सुलट चर्चा ऐकायला मिळाली. पंचायत समितीवर प्रशासक असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
0 टिप्पण्या