⭕पूर्व सूचना देऊनही अकलूज मध्ये ध्वनीप्रदुषण कायदयाचे उल्लंघन
💢 अकलूज मध्ये 11 मंडळां सह डीजे धारकां वर गुन्हा दाखल
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/02/2026 : पूर्व सूचना देऊनही अकलूज मध्ये ध्वनीप्रदुषण कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे अकलुज पोलीस ठाणेत शिवजंयती उत्सव २०२६ मिरवणुकीतील 11 मंडळांसह डीजे धारकांवर ध्वनी प्रदुषण कायदया अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व प्रितम यावलकर (अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण) यांनी सोलापुर जिल्हयातील सर्व शिवजंयती उत्सव मंडळे व शिवप्रेमी नागरिकांची शिवजयंती उत्सव २०२६ चे अनुशंगाने पोलीस मुख्यालय सोलापुर ग्रामीण येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत सोलापुर ग्रामीण हददीतील नागरींकाना शिवजयंती मिरवणुकीत डिजे /डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वादयांचा वापर करण्याचा व शिवजंयती उत्सव कालावधीत सामाजिक उपक्रम राबविण्याचे अहवान करण्यात आलेले होते. त्याअनुशंगाने अकलुज पोलीस ठाण्यात संतोष वाळके (उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग) व निरज उबाळे (पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे) यांनी अकलुज पोलीस ठाणे हददीत शिवजयंती उत्सव २०२६ हा शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन हददीतील सर्व शिवजंयती उत्सव मंडळे, डि.जे. व डॉल्बीधारक/चालक तसेच नागरीकाची बैठक घेवुन शिवजंयती मिरवणुकीत डि.जे. / डॉल्बीचा वापर न करता पांरपारिक वादयांचे वापर करुन मिरवणुक शांततेत पार पाडण्याचे व उत्सव कालावधीत सामाजिक उपक्रम राबण्यिाचे अहवान केले होते. मिरवणुकी दरम्यान ध्वनी प्रदुषण कायदयाचे उल्लंघण होणार नाही याचे दक्षता घेणेबाबत याबाबत सर्व मंडळांना सुचना देवुन त्यांना भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीस देण्यात आल्या होत्या.
तथापी दिनांक २०/०२/२०२६ रोजी अकलुज शहरातील वेगवेगळया शिवजंयती उत्सव मंडळाने मिरवणुकीत मोठ्या आवाजात डि.जे/डॉल्बी व लेजर शो याचा वापर करुन सार्वजनिंक शांतता भंग करुन सामन्य नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करुन ध्वनीप्रदुषण कायदयाचे उल्लंघन केले तसेच जिल्हाधिकारी, सोलापुर यांचे कडील जा.क्र. २०२६/डिसीबी-२/आरआर-११० दिनांक १२/०१/२०२६ चे आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन अकलुज पोलीस ठाणे हददीतील ११ शिवजयंती उत्सव मंडळ व डिजे/डॉल्बी चालाकांविरुध्द अकलुज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३,२ (५) व ध्वनी प्रदुषण अधिनियत २००० चे कलम ३,४,८ व पर्यावरण संरक्षण अधिनियत १९८६ चे कलम
१५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्याचा तपास चालु आहे. गुन्हे दाखल असलेल्या मंडळाची व डिजेधारकांची नावे व त्यांनी उल्लंघण केलेल्या ध्वनीप्रदुषण पातळी खालील प्रमाणे
कारवाई झालेली मंडळे आणि ध्वनी पातळी (डेसीबलमध्ये)
अ.क्र. मंडळाचे नाव ध्वनी पातळी (डेसीबल)
१) संभाजीराजे प्रतिष्ठान, अकलुज १२५ डेसिबल.
२) रामरहिम प्रतिष्ठान, अकलुज ११८ डेसिबल.
३) नवक्रांती प्रतिष्ठान, अकलुज ११७ डेसिबल.
४) लहुजी साम्राज्य प्रतिष्ठान, अकलुज ११५ डेसिबल.
५) स्वराज्य प्रतिष्ठान, यशवंतनगर ११२ डेसिबल.
६) शिवदत्त प्रतिष्ठान, अकलुज ११० डेसिबल.
७) शिवमुद्रा प्रतिष्ठान, अकलुज ११० डेसिबल.
८) हिंदवी प्रतिष्ठान, अकलुज १०८ डेसिबल.
९) महाराज प्रतिष्ठान, अकलुज १०७ डेसिबल.
१०) सहयाद्री प्रतिष्ठान, अकलुज १०५ डेसिबल.
११) छावा ग्रुप, अकलुज १०५ डेसिबल.
0 टिप्पण्या