मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/01/2026 :
आज १ जानेवारी २०२६. नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन संकल्प करण्याचा. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वास नेण्याचे ठरवण्याचा. ठरवण्याचा अशासाठी की आपण खरेच फक्त ठरवतो.
संकल्प आजच करायचा असे काही नाही. आपण तो कधीही करू शकतो. महत्वाचे हे की तो संकल्प आपण पूर्ण करायचा असतो. संकल्प नेहमी सकारात्मक असावेत जेणेकरून आपल्यामध्ये चांगला बदल होतो.
लवकर उठणे, व्यायाम करणे, नियमित अभ्यास करणे, वेळ पाळणे याच्या सोबत मोठ्यांनी स्क्रीन टाइम कमी करण्याचे नक्कीच ठरवले पाहिजे. मोबाईल दूर व मुले जवळ केली पाहिजेत.
आजचा संकल्प
संकल्प करणे म्हणजे मनापासून ठरवणे. कोणी सांगून किंवा सक्ती करून काही गोष्टी केल्या जात नाहीत हे लक्षात घेऊ व स्वतःच्या आवडीच्या गोष्टींचा संकल्प करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या