मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/12/2025 :
जीवनात अनेक प्रकारची माणसे भेटतात. सगळीच आठवणीत राहतात असे नाही. नातलग, मित्रपरिवार यांच्या व्यतिरिक्त खूप कमी लोक आपल्या आठवणीत असतात.
एखादी भेट होऊन पण खास आठवतात असेही काही लोक असतात. त्यांच्याशी निगडित काही प्रसंग आपल्या स्मरणात असतात. कोणाच्या दिसण्यामुळे, विशिष्ठ लकबीमुळे तर काही त्यांच्या स्वभावामुळे लक्षात असतात.
चांगल्या कारणाने आपली कोणी आठवण काढावी हे निश्चितच चांगली बाब आहे. आपल्या विषयी कोणी दुर्गुण लक्षात ठेवावेत आणि आपल्या अपरोक्ष त्याची चर्चा व्हावी, आपल्याला दूषणे द्यावीत असे वर्तन काय कामाचे? अशा आठवणी नकोत.
आजचा संकल्प
आपल्या भेटीगाठी पडतात, सहवास घडतो तो योगायोग असला तरी आपल्याला आठवताना, त्यांच्याजवळ आपल्या चांगल्या आठवणी असतील याची आपण काळजी घेऊ व सकारात्मक भाव वाढीस लावू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या