सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक  02/01/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष  संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाचे ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा  कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील व ट्रस्टचे सचिव  राजेंद्र चौगुले यांच्या उपस्थितीत डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे(क्रिकेट महासंग्राम) उद्घाटन दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे  यांनी दिली. 

सदर स्पर्धेमध्ये ४८ क्रिकेट संघाची नाव नोंदणी झाली असुन भरघोस  बक्षिसे भेट देण्यात येणार आहेत. त्यामध्ये  दोन गटामध्ये सामने होणार असुन संस्था वाईज गट व गाव वाईज गट असे गट असतील. दोन्ही गटांना वेगवेगळी पारितोषके देण्यात येणार आहेत. प्रथम चार विजेत्या संघास प्रथम पारितोषक ५१०००/- रु. व चषक द्वितीय पारितोषक ३१०००/- रु.व चषक, तृतीय पारितोषक २१०००/- रु.व चषक तसेच चतुर्थ पारितोषक ११०००/- रु.व चषक ,सामनावीर पुरस्कारासाठी बॅट तर मालिकावीर पुरस्कारासाठी चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज व विजेता उपवेजेता संघास प्रत्येकी १५ सयाजीराजे पार्क चे पास बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत. असे एकूण ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

संघाची प्रवेश फी ३५००/- रु. असुन  सामने डे-नाईट या वेळेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. प्रदीप पांढरे (९५१८९२७९२८) ,  प्रा. गौरव देशपांडे(८२०८८९०७४३) व प्रा. रविकांत देशमुख (९७६३६३६६६३)  हे काम पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या