विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/01/2026 :
कालचा विषय पुढे घेतला तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे योग्य-अयोग्यचा विचार करा. पालक योग्यच मार्गदर्शन करणार पण तुम्हाला ती सक्ती वाटणार. त्यांचा अनुभव असतो, बरे-वाईट काय ते त्यांना माहित असते.
आपण नक्कीच पालकांच्या पेक्षा वैचारिक दृष्टीने कमी असतो. शालेय शिक्षण व व्यवहारज्ञान यात फरक असतो. मोबाईलचा अती वापर, त्याचा दुरुपयोग आपल्याला मोठ्या संकटात पोहोचवू शकतो.
मुलींनो, स्पष्टच सांगायचे म्हटले तर तुमची इन्स्टाग्रामवरिल मैत्री, पालकांना अंधारात ठेवून घेतलेले चुकीचे निर्णय तुमचे जीवन बरबाद करू शकतात. आपले पालक आपले भलेच चिंतत असतात. त्यांना आपली काळजी असते.
पालकांना फसवणे म्हणजे स्वतःचे अहित करणे. वेळीच सावध व्हा, स्वतःला सावरा.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या