वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/01/2026 :
२०२५ साल संपून २०२६ सुरू झाले. वर्षाचे नवीन कॅलेंडर भिंतीवर आले आणि नवीन संकल्प करण्याची सुरुवात झाली. हे संकल्प किती दिवस टिकतात ती गोष्ट वेगळी.
तुम्ही मित्रांनी बऱ्याच गोष्टी ठरवल्या असतील. नियमित वाचन-लेखन करणे, पाढे पाठ करणे, सूत्रे पाठ करणे, रोज सर्व कविता म्हणणे वगैरे. हे झाले अभ्यासाचे. या व्यतिरिक्त जीवनात पुढेही उपयोगी पडतील अशा काही चांगल्या सवयी असल्या पाहिजे.
मुलांनो, वेळ पाळायला शिका. शाळेत, क्लासला वेळेत जा. कोणता कार्यक्रम असो किंवा एखादी सभा असो वेळेत हजर रहा. तुमचा वक्तशीरपणा भविष्यात तुमची ओळख होईल. ही सवय इतरांनाही वेळेचे महत्व पटवून देईल.
गेलेली वेळ परत येत नाही म्हणून तिचा सदुपयोग करा. Remember Time is money.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या