RBI कडून बचत खाते नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल; मिनिमम बॅलन्स, मोफत व्यवहारांवर नवा निर्णय

 RBI कडून बचत खाते नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल; मिनिमम बॅलन्स, मोफत व्यवहारांवर नवा निर्णय

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 07/12/2025 :

देशातील बहुतांश नागरिकांकडे बँक खाते आहे आणि दैनंदिन आर्थिक व्यवहारांपासून बचत करण्यापर्यंत बँकिंग सेवांची गरज प्रत्येकाला भासते. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक वेळोवेळी बँकांच्या नियमांमध्ये बदल करत असते. त्याच अनुषंगाने, आरबीआयने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की आता BSBD खाते हे ‘सामान्य बँकिंग सेवा’ म्हणून गणले जाईल. ग्राहक हे खाते पूर्णपणे शून्य शिल्लक (Zero Balance) वर उघडू शकतील आणि ठेवूही शकतील. यापूर्वी अनेक बँका किमान सरासरी शिल्लक (MAB) न ठेवल्यास दंड आकारत किंवा खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करत. मात्र आता ही सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली असून ग्राहकांचे खाते शून्य शिल्लक असले तरी कोणताही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही.

BSBD खात्यांसाठी अनेक सुविधा पूर्णपणे मोफत

डेबिट/ATM कार्ड मोफत आणि वार्षिक शुल्क शून्य

चेकबुकवर वर्षाला 25 चेक पाने पूर्णपणे मोफत

UPI, NEFT, RTGS, IMPS व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही

इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा देखील विनामूल्य

आरबीआयने स्पष्ट केले आहे की BSBD खात्यांवर कोणतेही हिडन चार्जेस आकारले जाणार नाहीत.

मोफत व्यवहारांची मर्यादाBSBD खात्यातून ATM किंवा बँक शाखेतून महिन्याला एकूण 4 वेळा पैसे काढणे मोफत असेल. त्यानंतर सामान्य शुल्क लागू होईल. मात्र डिजिटल व्यवहारांना मोकळीक देण्यात आली आहे; म्हणजेच UPI पेमेंट कितीही केले तरी ते या 4 व्यवहारांमध्ये मोजले जाणार नाहीत.

जुने खाते BSBD मध्ये रूपांतरित करण्याची सुविधाग्राहक आपले विद्यमान सेव्हिंग खाते सात दिवसांच्या आत BSBD खात्यात मोफत रूपांतरित करू शकतात. पूर्वीचे BSBD खातेधारक सुद्धा नव्या नियमांनुसार सर्व मोफत सुविधा तत्काळ वापरू शकतील. यासाठी बँकांनी कोणताही विलंब करू नये, असे आरबीआयचे स्पष्ट निर्देश आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या