मनाची शुद्धता

 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 09/12/2025 :

दैनंदिन जीवनात वावरताना विविध स्वभावाच्या अनेक व्यक्तींशी संबंध येतो. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, विचार वेगळे त्यामुळे प्रत्येक वेळेस आपले व त्यांचे जमेलच असे नसते.

आपल्या मनात कोणताच स्वार्थ नसेल किंवा अपपरभाव नसेल तर आपण सर्वांशी व्यवस्थित संवाद साधू शकतो. तुझे-माझे होत नाही. उगीचच एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला विरोध केला जात नाही.

मात्र आपल्या मनात काही स्वार्थ असेल तर आपल्या विधानाचा विपरीत परिणाम होईल या भीतीने आपण चुकीला चूक किंवा योग्य असेल त्याला बरोबर म्हणू शकत नाही.

आजचा संकल्प

आपल्या परिवारातील सदस्य एकत्र असतील तेंव्हा आपली मते कोणावर न लादता व कोणाच्या मतांचा आपल्यावर दबाव येऊ न देता मोकळ्या मनाने संवाद साधू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या