काय जादू केलीस

 काय जादू केलीस

[मुक्तछंद]

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 13/12/2025 :

काय जादू ही केलीस,

तुझीच होऊनी गेले.

न पिताही नशेत मी

रहाते तुझ्याच कायम...१


दिवस–रात्र विचार

तुझ्या रहाते करत  ,

काहीच सुचत नाही,

भान हरवून जाते...२


मनातील भावनांचा

गोंधळ सांगते तुला,

मीही मोकळी होते,

आनंदी रहाते नित्य...३


एकांतात साथ तुझी

लाभली आहे सुंदर,

प्रेमात पडले तुझ्या,

रहाशी साथीला माझ्या...४


जादूगर काव्यसखा,

व्यक्त होते तुझ्यापाशी.

विचार कधी अनुभवी,

तर कधी काल्पनिक...५


जादू मजवर झाली,

अशी न ऊतरणारी.

जादुगीरीत काव्याच्या ,

कवयित्री मीही झाले...६

✍️@सौ.धनश्री म्हेत्रस पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या