नकारात्मकता व भावनिक आरोग्य
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/12/2025 :
एका व्यक्तीची नकारात्मकता संपूर्ण कुटुंबाच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करते.एका व्यक्तीची सततची नकारात्मकता घरातील वातावरण हळूहळू जड करते.
मानसशास्त्र सांगते की माणसाच्या भावना संसर्गजन्य असतात. कोणीतरी सतत तक्रारी करतो, दोष देतो किंवा उदासपणे वागतो, तेव्हा त्याचा ताण इतरांच्या मनातही साचायला लागतो. घरातील मुलं अशा वातावरणात जास्त संवेदनशील असतात. त्यांना सुरक्षितता आणि स्थिरता हवी असते, पण नकारात्मक वर्तणूक त्यांच्यात असुरक्षितता किंवा गोंधळ निर्माण करू शकते.
कुटुंबातील इतर सदस्यही अशा उर्जेमुळे थकतात. संभाषण कमी होतं, एकमेकांपासून अंतर वाढतं आणि छोट्या गोष्टींवर वाद निर्माण होतात. संशोधनानुसार, निरंतर नकारात्मकतेमुळे कुटुंबातील सर्वांचं भावनिक आरोग्य ढासळू शकतं. त्यामुळे अशा वर्तणुकीची कारणं समजून घेणं, संवाद वाढवणं आणि गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घेणं उपयोगी ठरतं. सकारात्मक वातावरण निर्माण करणं ही कुटुंबाची एकत्रित जबाबदारी असते.
राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ

0 टिप्पण्या