मनाची शुद्धता

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 20/12/2025 :

दैनंदिन जीवनात जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात. नोकरी-व्यवसाय, रोजंदारी काहीतरी करून पैसे कमवावे लागतात. त्यातून आपण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो.

त्याच वेळेस आपल्याला निसर्गाकडून अनेक गोष्टी मोफत मिळतात. खळाळून वाहणाऱ्या नद्या आपली तहान भागवतात. मोकळी हवा आपल्याला ऑक्सिजन देते तर सूर्य प्रकाश व ऊर्जा देतो, वृक्ष फळे, फुले, सावली देतात.

हे सर्व फुकट असल्याने याची आपल्याला किंमत समजत नाही. त्याचे महत्व कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण करून आपण जल, वायू, ध्वनी प्रदूषण करतो व आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो.

आजचा संकल्प

निसर्गाच्या कृपेने मिळणाऱ्या गोष्टी शुद्ध स्वरूपात मिळाल्या तर सर्वांचेच आरोग्य निरोगी व सुदृढ राहील याची जाणीव ठेवू व प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या