महापरिनिर्वाण दिन... शपथ घेण्याचा दिवस
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/12/2025 : दरवर्षी ६ डिसेंबर रोजी मुंबई येथे दादर येथील चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी येतात.. त्यांना अभिवादन करतात आणि आदरांजली वाहतात.कारण
आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात दिन दलितांसाठी अस्पृश्यांसाठी कार्य केले .त्यांना त्यांची सामाजिक शैक्षणिक राजकीय हक्क मिळवून देण्यासाठीच अखंड झगडत राहिले ." शिका संघटित व्हा संघर्ष करा "हा संदेश दिला. इतकेच नसून तर बहिष्कृत हितकरणी सभा, दलित शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थांची स्थापना केली. मोफत वाचनालये ,सरस्वती विलास सारखे मासिक सुद्धा काढले. शिक्षणाचा प्रसार केला कारण शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होणार नाही हे त्यांना कळून चुकले होते.
अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी त्यांना सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत तरतूद केली. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज कल्याणकारी धोरणामुळेच आज समाजात सर्वच घटकातील समुदायांच्या विकासाला चालना मिळत आहे. जातीय व्यवस्थेचे उच्चाटन झालेले आहे .कश्मीर समस्या असो वा स्त्रियांसाठीचे शिक्षण हक्क राजकारणातील स्त्रियांचे आरक्षण याबाबात ही आंबेडकरांनी संविधानात तरतूद केलेली आहे. यामुळेच आज स्त्रिया ह्या सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी बजावत असताना आपण पाहत आहोत.
खऱ्या अर्थाने एकट्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच जाती अंतासाठी लढा दिला. समतेसाठी लढा दिला .त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समता बंधुता आणि समानता यासाठीच समर्पित केले.
त्यांनी समस्त कनिष्ठ अस्पृश्य ठरवलेल्या जातींना अहिंसेचा शांततेचा बुद्ध धम्म दिला.
"बुद्ध आणि त्यांचा धम्म" लिहून झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांना अस्पृश्य लोकांसाठी दिन दलित लोकांसाठी अजून खूप कार्य करायचे राहून गेले. म्हणून आजचा हा ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस शपथ घेण्याचा ही दिवस आहे.. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आहे.संकल्प करण्याचा दिवस आहे. म्हणून या आपण सर्वांनी मिळून शपथ घेऊया व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या समता बंधुता आणि समानता या मार्गावर चालू या , समस्त जनकल्याण करण्याचा संकल्प करूया..!!
लेखिका:
श्रीमती.अंजली कानिंदे मुनेश्वर नांदेड ९६३७११६५५३

0 टिप्पण्या