सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” (एफ. डी. पी.) या कार्यशाळेचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ८ डिसेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये शिक्षकांचा संशोधन स्तर उंचाविण्याच्या उद्देशाने " आऊट कम बेस्ड एज्युकेशन (ओ.बि.डी.) अँड एन.बी.ए. ऍक्रेडिटेशन " या विषयावर इन्सिल्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
तरी पंचक्रोशीतील सर्व शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी केले.
सदर कार्यशाळेमध्ये विविध संस्थेचे तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल निकम (७८७५९५४४४२) व प्रा. गौरव फडे (९७३०३११०६७) काम पाहणार असुन सहभाग घेण्यासाठी वरील नंबर वरती आपण संपर्क साधावा.

0 टिप्पण्या