दत्तगुरु
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/12/2025 :
दत्तगुरुंचा घोष चालला
चला जाऊया औंदुंबरी
अनुसयेच्या ओटीमध्ये
ब्रह्मा, विष्णु, महेश्वरी
गोजिरवाणी तीन बालके
फिरली अवतीभवती
अनुसूयेच्या भावभक्तीने
आचवली पदरी नाती
मार्गशीर्ष पुनवेच्या दिवशी
दत्तनाम त्रिमूर्ती मिळाले
रमा पार्वती, सरस्वतीला
पाहूनी भरते आले.
कशास घ्यावी परीक्षा इथे
शिव विष्णू भक्तांची
बालरूप त्रिमूर्ती पाहून
मती गुंगली देवींची
अनूसुयेची भक्ती पाहून
देवींचे ही मस्तक झुकले
हासत गाली त्रिदेवांना
बालरुप ही आवडले
भक्तीचे हे अतूट नाते
ह्रदयात पासून जपलेले
देवांच्या इच्छेवर सतीने
बालकास घास भरवलेले
प्रा.मानसी जोशी

0 टिप्पण्या