🟢 "ओंकार शुगर" चे चेअरमन बोत्रे पाटील थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडात 🟠 शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांच्या समस्यां जाणुन घेवुन त्यांचा "ओंकार" परिवाराच्या वतीने सन्मान

🟢 "ओंकार शुगर" चे चेअरमन बोत्रे पाटील थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडात

 🟠 शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांच्या  समस्यां जाणुन घेवुन त्यांचा "ओंकार" परिवाराच्या वतीने सन्मान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 22/12/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी निमगाव ( म.) ता. माळशिरस येथील ऊस उत्पादक शेतकरी सुखदेव मगर यांच्या ऊसाच्या फङात जावुन ८६०३२ ऊसाचे एकरी १०० टनाच्या पुढे उत्पन्न कसे काढले, व  एका ऊसाला   ४७  कांङ्या आहेत हे प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी सुखदेव मगर,  वाहन मालक अरूण मगर, महिला कामगारांचा "ओंकार" परिवाराच्यावतीने  बोञे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

बाबुराव बोञे पाटील हे स्वतहून ऊसाच्या फङात आले ऊसाची पाहणी करून सर्वाच्या समस्या जाणून घेतल्या बद्दल सर्वजण भारावुन गेले.  जिल्ह्य़ात उच्चांकी दर दिल्याबद्दल बोञे पाटील यांचा शेतातच सन्मान करून आभार व्यक्त केले.

निमगाव व परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी ऊसाचे एकरी उत्पन्न १00टनाच्या आसपास काढले त्यांच्या परिश्रामाचे कौतुक केले. केले. आशा पध्दतीने ऊसाचे उपन्न घेतल्यास ऊसाच्या शेतीतुन निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील आर्थीक प्रगती होईल. ओंकार  परिवार ऊसास उच्चांकी दर देण्यास कटिबद्ध याचा पुनरुच्चार बोञे पाटील यांनी केला.

या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, केन मॅनेजर शरद देवकर, ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पवार, प्रकाश मगर, शांतिलाल काटकर, सुरेंद्र मगर, अशोक मगर, मल्हारी मगर, महावीर मगर, शेखर मगर,  आण्णा जाधव, सुनिल पांढरे, संतोष पाटील, तानाजी साठे, रामचंद्र पवार व तोङणी कामगार उपस्थित होते. 

 "कारखान्याचे चेअरमन यांनी ऊसाच्या फङात येऊन आमची विचारपुस करून आमचा सन्मान करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील आहेत." बिभीषण कांबळे ऊसतोङणी कामगार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या