निमगाव येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा २१ डिसेंबर पासुन प्रारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव प्रतिनिधी : जवाहर शिक्षण प्रसारक मंङळ निमगाव ( म.) ता. माळशिरस संचलित कै.धनंजयराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे ६ गटात 21 , 22, 23 डिसेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
गट पहिला : इयत्ता 1 ली 2 री विषय: माझी ताई, माझे गुरू,माझ्या मामाचे गाव
गट 2 रा : 3 री 4 थी : मी कोण होणार, मला घाङविते माझी शाळा, माझ्या गावाची याञा
गट 3 रा : ५ ते ७ वी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, अरे माणसा कधी होशील माणूस, माझे आवडते पुस्तक
गट 4 था : ८ ते १0 वी रयतेचे राजे शिवछञपती. स्ञीशक्ती राष्ट्रशक्ती. स्वदेशीचा वापर काळाची गरज
गट 5 वा : ११ ते १२ वी ऑपरेशन सिंदुर. मी शेतकरी बोलतोय . एक भारत श्रेष्ठ भारत.
महाविद्यालयीन गट : पर्यावरण रक्षण काळाची गरज, सोशल मिङिया तारक की मारक, शिक्षणाच्या बदलत्या संकल्पना. विजेत्या स्पर्धकांना ट्राॅपी व रोख बक्षीस दिले जाईल.
या स्पर्धा 21 डिसेंबरला निमगाव विद्यामंदिर निमगाव येथे सकाळी ११ वाजता सुरू होतील. स्पर्धांकांनी शाळांनी लेटर हेड वर नोंदणी करावी. सर्व शाळा महाविद्यालय यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे
असे आवाहन जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार, मुख्याध्यापक टी. एच्. ननवरे व स्पर्धा प्रमुख रामचंद्र आसबे यांनी केले.

0 टिप्पण्या