मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 11/12/2025 :

जीवन "क्षणभंगुर" आहे असे आपण नेहमीच ऐकतो, अनेकदा अनुभवतो. थोड्या काळापूर्वी गाठ पडली होती, कालच भेटलो होतो आणि व्यक्ती गेली. सर्व जागेवर राहते.

खरे तर हे सत्य आपणा सर्वांनाच माहित आहे. येताना काही आणले नव्हते, जाताना काहीच घेऊन जात नाही तरीही आयुष्यभर कमावण्यासाठी अन् जमवण्यासाठी पळत असतो.

जीवनाचा आनंद घेत गरजे इतकेच जमा करावे, जास्तीचे असेल तर इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. देण्यातील आनंद फार वेगळा असतो. वेळ द्या, सल्ला द्या, आनंद द्या. इच्छा असेल आणि शक्य असेल तर पैसे द्या. दिल्याशिवाय समोरच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवता येत नाही.

आजचा संकल्प

रिकाम्या हाती आलो आहोत, रिकाम्या हातांनी जाणार आहोत, मात्र जेवढा काळ इथे आहोत त्यात इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवूया, आणि या मर्त्य जगात चांगल्या आठवणींच्या रूपाने अमर होऊया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या