मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/12/2025 :
जीवन जगताना अनेकदा चांगले अनुभव येतात तसे वाईट अनुभव पण येतात, अनंत अडचणी येतात. कोणी मदतीला येतात तर कोणी मजा पाहतात, हसतात, टर उडवतात. अशा वेळेस कोणाच्या तोंडाला हात लावणार?
आपणच आपल्याला सावरायचे. कणखर बनायचे. आत्मनिरीक्षण करायचे, चुका शोधायच्या अन् अनुभव गाठीशी बांधून अडचणीतून मार्ग काढायचा. आपल्या भक्कम पायावर उभे राहून दणकट खांद्यांवर भार पेलायचा.
कोणी पाय ओढतात तसे कोणी मदतीचा हात पण देतात. मात्र वाट पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपणच आपल्याला हात द्यायचा. स्वतःच स्वतःचे मदतनीस व्हायचे अन् यशस्वीपणे पुढे निघायचे.
आजचा संकल्प
आयुष्यभर कोणाची ना कोणाची मदत घेण्यापेक्षा स्वतःलाच सक्षम बनवू. अडचणी आल्या तरी त्यावर मात करू. थोडी उसंत घेऊ अन् जोमाने पुढे जाऊ, ध्येय गाठू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या