सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय समूहनृत्य स्पर्ध्येमध्ये उत्तुंग यश

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय समूहनृत्य स्पर्ध्येमध्ये उत्तुंग यश  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 15/12/2025 : प्रताप क्रिडा मंडळ  शंकरनगर-अकलूज येथे  जयसिंह शंकरराव  मोहिते पाटील व स्वरुपारणी  जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली राज्यस्थरीय समूहनृत्य  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या समूहनृत्य स्पर्धे मध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महावि‌द्यालयातील विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

सदरील स्पर्धेमध्ये एकूण १५० गीतांचा सहभाग असुन  प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील २७०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाने (गीताचे बोल - बारीश कि जाये) प्रथम क्रमांक मिळविला. या त्रिवार यशामूळे आपल्या महाविद्यालयाचे नांव सोलापूर जिल्ह्यात उंच शिखरावर पोहचले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समन्वयक म्हणून प्रा. श्रेया देशमुख, प्रा.वर्षाराणी तूपे व प्रा.रविकांत देशमुख तसेच सर्व कर्मचारी वृंद  यानी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या