🔰 खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रम” अंतर्गत माढा मतदारसंघातील उद्योजकांना गुजरात अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी
🟠 खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने अभ्यास दौऱ्यांचे आयोजन
🟢 गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेण्यात येणार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/12/2025 :
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रम” या विशेष उपक्रमांतर्गत सलग दुसऱ्या वर्षी सोलापूर जिल्हा व माढा लोकसभा मतदारसंघातील नवोदित तसेच कार्यरत उद्योजक व बचतगटातील महिलांसाठी गुजरात गांधीनगर येथे 15 ते 18 डिसेंबर २०२५ यादरम्यान होणाऱ्या खाद्यखुराक 2025 प्रदर्शनासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.
अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी उद्योजकांसाठी "शिवरत्न शिक्षण संस्था" शंकरनगर अकलूज येथे गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर त्वरित जाहीर केला जाईल, तसेच त्याच दिवशी पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. परीक्षेसाठी उमेदवारांनी आधारकार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
गतवर्षी या अभ्यास दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतवर्षी अभ्यास दौरा केलेल्या अनेक नवउद्योजक यांनी नवीन यंत्रसामुग्री खरेदी केली, व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व इतर माहीती मिळाल्यामुळे व्यवसायात नवीन ग्राहक मिळाले एकंदरीत या उपक्रमाचा उद्देश स्थानिक उद्योजकांना आधुनिक उद्योग संकल्पना, व्यवस्थापन तंत्रे, उत्पादन प्रक्रिया आणि राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांविषयी थेट माहिती मिळवून देणे हा आहे.
या कार्यक्रमात सध्या व्यवसाय करत असलेले तसेच नवीन उद्योग सुरु करू इच्छिणारे युवक, महिला बचत गट सदस्य, व इतर इच्छुक उद्योजक सहभागी होऊ शकतात. अभ्यास दौऱ्याचा संपूर्ण खर्च आयोजक संस्थांकडून केला जाणार आहे.
या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबनाची दिशा देत उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे हा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रजिस्ट्रेशन लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSew6XfgbQmu9cIk4fjlx9OpQV4PORda2PF6pJSRfa5toAKATA/viewform
भारत साठे ९०११३११४०६
तुळशीराम पिसाळ ९८२२१७३४५५


0 टिप्पण्या